आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोलेरो-कारमध्ये अपघात;१५ जखमी, कठोरा नाका मार्गावर सायंकाळी घडला अपघात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मजूर घेऊन जाणाऱ्या मालवाहू बोलेरो वाहनाचा फियाट कारसोबत झालेल्या भीषण अपघातात बोलेरोमध्ये बसलेले १४ मजुरांसह कारचालक गंभीर जखमी झाला. हा अपघात कठोरा नाका ते पोटे कॉलेज मार्गावर शनिवारी (दि. ७) सायंकाळी घडला. 

राहुल रवींद्र देशमुख (रा. साईप्लाझा, यशोमंगल कॉलनी, अमरावती) असे गंभीर जखमी झालेल्या कारचालकाचे नाव आहे. राहुल देशमुख यांना उपचारासाठी नागपूरला पाठवण्यात आले आहे. शनिवारी सायंकाळी वाजताच्या सुमारास शहरातून चांदूर बाजारच्या दिशेने १६ मजुरांना घेऊन बोलेरो मालवाहू (क्रमांक एम. एच. २८ बी ९६७२) वाहन जात होते. कठोरा नाक्यापासून काही अंतरावर असलेल्या आनंदविहार कॉलनीजवळ फियाट कार (क्रमांक एम. एच. २७ / ५५५०) घेऊन राहुल देशमुख आले. या दोन्ही वाहनांची धडक झाली. त्यामुळे हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. अपघातातील सर्व जखमींना इर्विन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कारचालक राहुल देशमुख यांना गंभीर दुखापत असल्यामुळे त्यांना उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आल्याचे गाडगेनगर पोलिसांनी सांगितले आहे. 

मालवाहू वाहनातील मजूरांची वाहतूक कधी बंद होणार ? 
पोटाची खळगी भरण्यासाठी मेळघाट किंवा परप्रातांतून येणाऱ्या गोरगरीब मजूरांना मालवाहू वाहनात बसवून घेऊन जातात. मागील दोन महीन्यात मजूर घेऊन जाणाऱ्या मालवाहू वाहनाचा हा तिसरा अपघात आहे. मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करता येत नसतानाही सर्रासपणे मजूरांना बसवून घेऊन जातात. तरीही आरटीओ किंवा वाहतूक पोलिसांकडून अशा वाहनांवर कोणतीही कारवाई झाल्याचे दिसत नाही. 
बातम्या आणखी आहेत...