आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'त्या' बेवारस 'टिफीन बॉक्स'मुळे खळबळ, राजापेठमध्ये बॉम्ब शोधक पथक श्वानाद्वारे तपासणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शहरातीलअत्यंत वर्दळीचे ठिकाण असलेल्या राजकमल चौकात रविवारी (दि. १४) सायंकाळी एक बेवारस 'टिफीन बॉक्स' नागरिकांना आढळला. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच सुरक्षा यंत्रणेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यातच स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राजकमल चौकात आढळलेल्या बेवारस डब्यामुळे खळबळ उडाली होती. बॉम्बशोधक नाशक पथकाच्या जवानांनी घटनास्थळी पोहचून हा डबा ताब्यात घेतला मैदानात नेऊन पाहणी केली असता त्यात जेवणाचे पदार्थ असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला. स्थानिक राजकमल चौकात सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान एक 'टिफीन बॉक्स' आढळला.

हा टिफीन एका पिशवीत ठेवण्यात आला असून त्याच्या आजूबाजूने कोणीही नाही. अशी माहिती पोलिसांना, बॉम्ब शोधक नाशक पथकाला देण्यात आली. माहिती मिळताच बॉम्बशोधक पथकाचे प्रमुख पोलिस निरीक्षक प्रदीपसिंग परदेसी, श्वान 'प्रिन्स' पथकातील कर्मचारी राजकमल चौकात पोहचले. पोलिसांनी गर्दी बाजूला सारत हा संशयास्पद 'टिफीन बॉक्स' स्कॅन केला, त्यामुळे त्यामध्ये स्फोटक पदार्थ नसल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र तरीही बीडीडीएस पथकाने 'रिस्क' घेता हा 'टिफीन बॉक्स' जप्त करून बाजूच्या नेहरु मैदानात आणला होता. त्यामध्ये जेवणाचे पदार्थ निघाले. 'टिफीन बॉक्स' कोतवाली पोलिसांच्या स्वाधीन केला.

'टिफीन बॉक्स'मध्ये होते जेवणाचे पदार्थ
^राजकमलचौकातसायंकाळी संशयास्पद 'टिफीन बॉक्स' असल्याची माहिती मिळाली होती. आम्ही घटनास्थळी जावून तपासणी केली, त्यामध्ये जेवणाचे पदार्थ निघाले. 'टिफीन बॉक्स' कोतवाली पोलिसांच्या स्वाधीन केला. प्रदीपसिंगपरदेसी, पोलिस निरीक्षक, बॉम्ब शोधक नाशक पथक.
राजकमल चौकात संशयित डब्याची तपासणी करताना जवान.
बातम्या आणखी आहेत...