आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमिकेला गुंगीचे औषध पाजून तयार केली अश्लील चित्रफीत, प्रियकराला पाच वर्षांची शिक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - प्रेमिकेला गुंगीचे औषध पाजून तिची अश्लील चित्रफीत तयार करून ती फेसबुकवर टाकणाऱ्या प्रियकराला न्यायाधीश जी. पी. सिरसाट यांनी पाच वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अजय शालिकराम गजभिये (४०) असे अाराेपीचे नाव अाहे.

या घटनेची तक्रार २६ जानेवारी २०१२ रोजी करण्यात आली होती. तेव्हा पीडित तरुणी दंतचिकित्सा कॉलेजची विद्यार्थिनी होती. तिची ओळख आरोपीशी झाली. ही ओळख मैत्रीत रूपांतरित झाली, परंतु एकदा त्याने बदनामी केल्याने तिने त्याच्याशी बोलणे बंद केले. २४ डिसेंबर रोजी तरुणीची भेट घेऊन अजय तिला एका रिसॉर्टमध्ये घेऊन गेला. तिथे त्याने तिला गुंगीचे औषध पाजून तिची अश्लील चित्रफीत तयार केली. यामुळे तरुणीने अजयशी पुन्हा संबंध तोडले. अजयने संपर्क साधण्याचे प्रयत्न केले असता तिने त्याला टाळले. त्यामुळे अजयने फेसबुकवर फेक अकाउंट तयार करून तिची अश्लील चित्रफीत टाकली. तसेच पीडित तरुणीच्या भावाला आणि बहिणीलासुद्धा ही चित्रफीत पाठवली.
बातम्या आणखी आहेत...