आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेल लायब्ररी अंधबांधवाना वाचनासाठी ठरणार पर्वणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- श्री शिवाजी महाविद्यालयात शहरातील एकमेव ब्रेल लायब्ररी सुरू झाली असून, अंध बांधवांना वाचनासाठी ही पर्वणी ठरणार आहे. ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त नाशिक येथील अंधव्यक्तीकरिता कार्य करणारी नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाईंड्स अम्वे इंडियाच्या सहकार्याने अंध विद्यार्थ्यांकरिता ब्रेल ग्रंथालयाची नुकतीच स्थापना करण्यात आली. ब्रेल ग्रंथालयाचे उद्घाटन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. अरुण शेळके यांच्या हस्ते पार पडले. 

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, तसेच नॅबचे सहसचिव श्याम पाडेकर, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, डॉ. गोविंद कासट, अम्वे इंडियाचे व्यवस्थापक मोहम्मद झीशान, डॉ. अंबादास मोहिते प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख यांची उपस्थिती होती. 

नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाईंड्स अम्वे इंडियाच्या सहकार्याने ब्रेल ग्रंथालयाकरिता ५०० ब्रेल लिपीतील कथा, कादंबरी तसेच वाचनीय साहित्य तसेच ५०० ग्रंथ सीडी स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याकरिता अद्यावत संगणक व्यवस्था स्पीकर, हेडफोन प्रिंटरची सुविधा देण्यात आली आहेत. ब्रेल ग्रंथालय अद्यावत असून महाविद्यालयाच्या ग्रंथालयाने एम. पी. शहा मेमोरिअल टोकिंग बुक्स सेंटरची आजीवन सदसत्व घेतले असून स्पर्धा परीक्षा महाविद्यालयीन अभ्यासक्रमिक साहित्याच्या सीडी अंध विद्यार्थ्यांकरीता उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 

श्याम पाडेकर यांनी ब्रेल ग्रंथालय उपक्रमाविषयी राज्यस्तरावरील उपक्रमाची माहिती दिली. याप्रसंगी डॉ. प्रकाश तायडे विभाग प्रमुख वाणिज्य विभागाला बेस्ट एन. लिस्ट युजर अवार्ड देण्यात आला. डॉ. एस. आर. रंगनाथन बेस्ट रीडर्स अवार्ड अनिल पाचकुडके एमफील (वाणिज्य), महेश जोशी बीएभाग दोन, आशिष ढोके एमए(राज्यशास्त्र) या विद्यार्थांना देण्यात आलेत. प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख यांनी सदर उपक्रमाच्या सहकार्याबद्दल दोन्ही संस्थेचे आभार मानले. विनोद जाधव, प्रवीण महल्ले, साहेबराव खंदारे, नवल सारडा, शरद कोनलाडे, गिरीश करवा, आशिष करवा, ग्रंथालय कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला अम्वेचे जेम्स मेथ्यु, शहरातील विविध शाळा, महाविद्यालयातील अंध विद्यार्थी, शिक्षक महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षेकेतर कर्मचारी उपस्थित होते. 

भाऊसाहेबांचे स्वप्न पूर्ण समाजातील सर्व घटकांना शिक्षण मिळावे हे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख स्वप्न अंध विद्यार्थ्यांकरिता ब्रेल ग्रंथालय स्थापन करून पूर्ण होत असल्याची भावना अॅड. अरुण शेळके यांनी व्यक्त केली.श्री शिवाजी शिक्षण संस्था समाजातील सर्व वंचित घटकांना शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...