आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अबू आझमी आणि अनिल गोटेंमध्ये बाचाबाची

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर |वादग्रस्त मुस्लिम धर्मगुरू डॉ. झाकीर नाईक हा देशभक्त असून त्याच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशन संस्थेवर केंद्राने घातलेली बंदी चुकीची असल्याचा आरोप करत बंदी मागे घेण्याची मागणी समाजवादी पार्टीचे नेते आमदार अबू आझमी यांनी विधानसभेत केल्याने ठिणगी पडून त्यांची भाजपचे आमदार अनिल गोटे यांच्याशी सभागृहात तसेच सभागृहाबाहेर जोरदार बाचाबाची झाली.

विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करताना आमदार अबू आझमी यांनी डॉ. झाकीर नाईक हा देशभक्त असल्याचे सांगितले. त्याच्या संस्थेवर केंद्र सरकारने घातलेली बंदी चुकीची असल्याचे सांगत बंदी मागे घेण्याची मागणीही त्यांनी केली. या मागणीमुळे भाजपचे जळगावातील आमदार अनिल गोटे संतापले.
डॉ. झाकीर नाईक हा देशद्रोही असून दहशतवाद्यांना पोसणाऱ्या देशद्रोह्याचे उदात्तीकरण करणे हादेखील देशद्रोह असल्याचा आरोप गोटे यांनी केला. त्यावरून त्यांच्यात आणि आझमी यांच्यात बाचाबाची सुरू झाली. आझमी यांनी सभागृहाबाहेर येऊन मीडियाला त्यासंबंधीचे बाइट दिले. त्यांच्या मागोमाग आलेल्या आमदार गोटे यांनीही पुन्हा आझमी यांच्या मागणीवर जोरदार आक्षेप घेतला.
बातम्या आणखी आहेत...