आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहिणीच्या प्रियकराचा भावांकडून खून, नागपूर जिल्ह्यातील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - बहिणीशी असलेले प्रेमसंबंध कायम ठेवल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा देऊनही तिला नेण्यासाठी आलेल्या प्रियकरावर मुलीचा भाऊ आणि काकाने लाठ्या-काठ्या आणि विटांनी हल्ला चढवून त्याला ठार मारले. नागपूर जिल्ह्यातील डोंगरगाव (ता. हिंगणा) येथे रविवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी तिघा जणांना अटक केली आहे.

अजय उर्फ गोलू सोनबाजी वरठी (वय २१) मृत तरुणाचे नाव अाहे. अजय हा किरकोळ कामे करायचा. नवरमारी येथील एका १६ वर्षीय मुलीशी त्याचे प्रेमसंबंध होते. दोघे नेहमी रात्री-बेरात्रीही सोबत दिसायचे. त्यामुळे मुलीचा भाऊ दिनेश उईके (वय २१) याने अजयला धमकी दिली हाेती. अापल्या बहिणीशी असलेले संबंध संपव, अन्यथा वाईट परिणाम हाेतील, असेही त्याने बजावले हाेते. मात्र धमकीला न जुमानता अजयने अापले प्रेमसंबंध कायम ठेवले होते.रविवारी पहाटेच्या सुमारास अजय हा मोटरसायकल घेऊन तिच्या घरी आला होता. त्याने हॉर्न वाजविल्यावर सदर मुलगी घराबाहेर पडून त्याच्यासोबत जायला निघाली होती. काही अंतरावरच मुलीचा भाऊ दिनेश, छाेटू उईके (वय १८) व व काका रतन उईके (वय २६) या तिघांनी अजय व सदर मुलीला अडविले. बहिणीला बाजूला नेऊन या तिघांनी अजयवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला चढविला. विटांनी बेदम मारहाणही केली. यात अजयचा जागीच मृत्यू झाला. रविवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळला.
बातम्या आणखी आहेत...