आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धम्मदीक्षेद्वारे डाॅ. बाबासाहेबांनी नीतीमत्तेची आदर्श शिकवण दिली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - राज्यातील कोपर्डी नाशिकमधील घटना मनाला क्षुब्ध करणाऱ्या आहेत. जगातील विषमता नष्ट करण्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी समतेचे विचार सांगून समाजाला सर्वधर्म समभावाची नीतीमत्तेची शिकवण दिली. तर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गौतम बुद्धांचे आदर्श आचार-विचार आपल्यात रुजवून १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बुद्ध धम्माची दीक्षा घेऊन समस्त मानव जातीसमोर एका आदर्श आचरणाची मुहर्तमेढ रोवल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. विलासनगरात आयोजित बुद्ध महोत्सवात बुद्धगया येथील महाबोधी विहाराचा शिल्पकृती देखावा तयार करण्यात आला. भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीला हार अर्पण करुन महाबोधी विहार शिल्पकृतीचे उद््घाटन करताना आठवले बोलत होते.
आपल्या जाती वेगळ्या असल्या तरी माणूस म्हणून आपण एक आहोत. मात्र, आज माणसामधली माणूसकी शिल्लक राहिलेली नाही अशा वाईट घटना घडत असल्याची खंत आठवले यांनी व्यक्त केली. कोपर्डीच्या घटनेनंतर अहमदनगर जिल्ह्यात दलित विरुद्ध सवर्ण असा कोणताही वाद नाही. मात्र राज्याची शांतता बिघडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. दोन समाजात तेढ निर्माण होणे चांगले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

देशासह राज्यातील दलित वस्तींचा सुधार करुन त्यांना हक्काचे घर मिळावे यासाठी रमाई आवास योजना अंमलात आहे. या योजनेचा लाभ प्रत्येक गोर-गरीब कुटूंबास व्हावा त्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी केंद्र सरकारकडून भरीव निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही आठवले यांनी या वेळी दिली. या प्रसंगी धम्मपीठावर पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार डॉ. सुनील देशमुख, अामदार रवि राणा, माजी आमदार अनिल गोंडाणे, बुद्ध महोत्सवाचे आयोजक तथा नगरसेवक प्रा. डॉ. प्रदीप दंदे, रामेश्वर अभ्यंकर, प्रकाश बनसोड, डॉ. भी.र. वाघमारे, महेंद्र भालेकर आदी उपस्थित होते.

बारादिवसांत साकारली प्रतिकृती
महाबोधी महाविहाराच्या प्रतिकृतीचा देखावा तयार करण्यात आला. ही शिल्पकृती ६० बाय ५० फूट क्षेत्रफळाची असून,ती तयार करण्यासाठी १२ दिवसांचा कालावधी लागला आहे. या साठी साडेचार लाख रुपये खर्च आला असून, मंगेश ढेपे पवन आसमकर या शिल्पकारांनी परिश्रम घेतले.

आठवलेंचा नागरी सत्कार
शेगावनाका जवळील अभियंता भवन येथे केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे,वरुड- मोर्शीचे आमदार डॉ. अनिल बोंडे, रिपाइं नेते डॉ. राजेंद्र गवई, माजी आमदार अनिल गोंडाणे, प्रा. सुभाष गवई, रामेश्वर अभ्यंकर प्रामुख्याने उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...