आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूखंड वादातून बिल्डरने केला वैद्य दांपत्याचा खून, नागपुरातील हत्याकांडाचा तीन महिन्यांनी उलगडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - बसपाचे संस्थापक कांशीराम यांचे निकटवर्तीय असलेल्या पंढरीनाथ वैद्य यांचा मुलगा व सुनेच्या खुनाचा उलगडा तब्बल तीन महिन्यांनंतर झाला. भूखंड विक्रीवरून झालेल्या वादात काही बिल्डरांनी या दांपत्याचा घरातच खून करून मृतदेह जंगलात नेऊन पुरल्याचे उघडकीस अाले आहे. उपराजधानीला हादरवून सोडणाऱ्या या खुनातील सहाही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांची १७ नाेव्हेंबरपर्यंत पाेलिस काेठडीत रवानगी केली आहे.
पोलिस सहआयुक्त संतोष रस्तोगी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अतुल पंढरीनाथ वैद्य व वंदना अतुल वैद्य या दांपत्याचा १२ अाॅगस्ट २०१६ राेजी खून झाला हाेता. याप्रकरणी पाेलिसांनी बिल्डर किरण नामदेवराव महाले, महेश मोती बलहारिया, चंद्रशेखर ऊर्फ बंटी अशोक बैसवारे, पंकज भोलाराम तिवारी, प्रणय प्रकाश नवनागे व लंकेश ऊर्फ लकी राजेंद्र जुगनाक यांना अटक केली आहे. नागपुरातील काशीनगर भागात अतुल व वंदना वैद्य आणि अतुलची आई असे तिघे राहत होते. त्यांचा तीन हजार चौरस फुटांचा भूखंड आहे. हा भूखंड विकण्याचा सौदा अतुलच्या आईने बिल्डर किरण महल्ले याच्यासोबत केला होता. मात्र, अतुलचा भूखंड विकण्यास तीव्र विराेध होता. हा माेक्याचा भूखंड मिळवण्यात अतुल अडथळा ठरत असल्यामुळे त्याला संपवण्याचा निर्णय किरण व इतर अाराेपींनी घेतला हाेता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ आॅगस्टला सायंकाळी किरण महाले आपल्या साथीदारांसह अतुलच्या घरी गेला. त्या वेळी अतुल बाहेर गेलेला होता. तेव्हा किरणने वंदनाशी बाेलून अतुलला समजावण्यास सांगितले. त्यावरून किरण व वंदना यांच्यातच वाद सुरू झाला, त्याच वेळी अतुल घरी आला. त्यानंतर किरण व अतुल यांच्यात चांगलीच वादावादी झाली. या वेळी किरणसह इतर अाराेपींनी अाधी वंदनाचा गळा दाबून खून केला. नंतर अतुलवर धारदार शस्त्रांनी वार करून त्याचाही खून केला. नंतर दोघांचेही मृतदेह एका चारचाकी गाडीतून बुटीबोरी पोलिस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या पाथरी थाना शिवारातील जंगलात नेऊन पुरले हाेते.
बातम्या आणखी आहेत...