आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिजाऊंच्या लेकींनी आवळली अत्याचाराविराेधात वज्रमूठ, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - ‘कोपर्डीयेथील निर्भया मी आहे, तुम्ही आहात. या निर्भयावर जे अत्याचार झाले. ते पुढे कधीही हाेऊ नयेत म्हणून अशा अाराेपींना फाशीची शिक्षा हाच एकमेव निर्णय आहे,’ अशी मागणी मराठा समाज क्रांती माेर्चातील युवतींनी साेमवारी बुलडाण्यात माेर्चानंतर झालेल्या भाषणात केली. तत्पूर्वी जिजाऊंच्या या लेकींसह लाखाेंच्या जनसमुदायाने मूकमाेर्चा काढून मराठा एकजुटीची वज्रमूठ अावळली.

दरम्यान, या माेर्चात १५ लाखांवर लाेक सहभागी झाल्याचा दावा अायाेजकांनी केला अाहे. तर पाेलिसांच्या मते अांदाेलकांची संख्या सहा लाखांपर्यंत हाेती. बुलडाणा शहराच्या जयस्तंभ चौकात साेमवारी सकाळी अाठ वाजेपासूनच माेर्चेकऱ्यांची गर्दी जमू लागली हाेती. हळूहळू हा जमाव लाखाचा अाकडा पार करून गेला. सुरुवातीला मोर्चेकऱ्यांना जयस्तंभ चौकातील मंचावरून सूचना दिल्या जात होत्या. चौकाचौकात लावलेल्या स्क्रीनवरून ध्वनिक्षेपकावरून सर्वांना सूचना मिळत होत्या. लाखोंच्या जनसमुदायामुळे मोर्चात नवचैतन्य सळसळले होते. अांदाेलकांच्या हाती मागण्यांचे फलक हाेते. भव्य माेर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पाेहाेचल्यानंतर नियोजनाप्रमाणे पाच तरुणी दोन महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर जिजाऊंच्या लेकींनी उपस्थितांचा मार्गदर्शन केले. इतर माेर्चांप्रमाणे बुलडाण्यातही स्वयंशिस्तीचे दर्शन घडले.
नंदुरबारमध्येही अलाेट गर्दी; दीड लाख नागरिक रस्त्यावर
नंदुरबार - नंदुरबारमधीलमराठा क्रांती मूकमोर्चाला चांगला प्रतिसाद मिळाला. सुमारे दीड लाख नागरिक सहभागी झाल्याचा दावा पोलिसांनी केला अाहे. तर माेर्चेकऱ्यांची संख्या दोन लाखांवर असल्याचा दावा संयाेजकांनी केला अाहे. या मोर्चात स्वयंशिस्तीचे दर्शन घडले. सकाळी वाजेपासून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाजवळ मोर्चासाठी गर्दी होण्यास सुरुवात झाली होती. मोर्चाला दुपारी बारा वाजता प्रारंभ झाला. चार किलोमीटर अंतरापर्यंत हा मोर्चा होता. मोर्चाच्या अग्रभागी जीपमध्ये पाच मुली होत्या. माेर्चाच्या समाराेपानंतर याच मुलींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

निवेदनातील मागण्या
कोपर्डीतीलआरोपींविराेधात खटला जलदगती न्यायालयात चालवावा, मराठा समाजाला शिक्षण नोकरीत १६ टक्के आरक्षण द्यावे, केंद्र राज्य सरकारच्या सूचीमध्ये मराठा समाजाचा समावेश करावा, अॅट्राॅसिटी कायद्याचा गैरवापर बंद करावा, त्यासाठी कायद्यातील अनेक जाचक अटींत दुरुस्ती करावी, शेतकरी आत्महत्या टाळण्यासाठी डाॅ. स्वामिनाथन आयोग लागू करावा, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना शहीद म्हणून घोषित करावे, सैनिकांना मिळणाऱ्या सोयीसुविधा त्यांना मिळाव्या, वृद्ध शेतकऱ्यांना हजार रुपये सन्मान वेतन द्यावे, आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना पाच लाख मदत द्यावी, मातृतीर्थ सिंदखेड राजा राष्ट्रीय स्मारक घोषित करावे, येथील बृहत आराखड्यातील २५० कोटी मंजूर करावे, स्मार्टसिटी सोबत स्मार्ट व्हिलेज कार्यक्रम हाती घ्यावा, मराठा समाजाची निंदा नालस्ती बंद करावी, ब.मो.पुरंदरे यांना शासनाने दिलेला महाराष्ट्र भूषण परत घ्यावा, अादी मागण्या निवेदनात अाहेत.
नंदुरबारमध्ये साेमवारी काढण्यात अालेल्या मराठा क्रांती माेर्चात शहर जिल्ह्यातील युवती महिला माेठ्या संख्येने सहभागी झाल्या हाेत्या.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, बुलडाणा आणि नंदुरबार येथील मोर्चाचे फोटो..
पुढेे पाहा, मोर्चाचा व्‍हिडियो..
बातम्या आणखी आहेत...