आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोस्टल कॉलनीत दोन बंद घरे फोडली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- मागील काही महिन्यांपासून शहरात सुरू झालेला चोरट्यांचा हैदोस थांबलेला नाही. चोरट्यांना पकडण्यात शहर पोलिसांना अजूनही यश आले नाही. यातच बुधवारी रात्री राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील पोस्टल कॉलनीमध्ये दोन घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केली. या वेळी दोन्ही घरी कोणीही नसल्यामुळे नेमका किती रुपयांचा ऐवज गेला, हे अद्याप समजू शकले नाही.
पोस्टल कॉलनीमधील रहिवासी जीवन मारोतराव टेकाम मागील १५ दिवसांपासून नागपूरला गेले आहेत. गुरुवारी सकाळी त्यांच्या घराचे मुख्य दार उघडे दिसल्यामुळे शेजाऱ्यांना चोरी झाल्याचा संशय आला. त्यांनी तत्काळ टेकाम यांना तसेच राजापेठ पोलिसांनासुद्धा क‌ळवले.याचवेळी परिसरातील अग्रवाल यांच्या घरीसुद्धा चोरी झालेली आहे. दोन्ही घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी प्रवेश केला आहे. घरातील कपाटातील साहित्य चोरट्यांनी अस्ताव्यस्त टाकलेले होते. सहा ग्रॅम वजनाचे मणी डोरले कपाटात दिसून आले नसल्यामुळे ते चोरट्यांनी चोरले असल्याचे टेकाम यांच्या बंधूनी पोलिसांना सांगितले आहे. तसेच अग्रवाल यांच्या घरातील ऐवजाबाबतही ते घरी परतल्यावरच माहिती होईल. या चोरीप्रकरणी राजापेठ पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बातम्या आणखी आहेत...