आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS - यवतमाळमध्‍ये बस नदीत कोसळली; 20 प्रवासी जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जखमींना बाहेर काढताना ग्रामस्‍थ. - Divya Marathi
जखमींना बाहेर काढताना ग्रामस्‍थ.

यवतमाळ - जिह्यातील पुसद-उमरेखड रस्‍त्‍यावर असलेल्‍या कोपरा गावाजवळ आज (मंगळवार) सकाळी 6:30 वाजताच्‍या सुमारास एक बस पुलाचे कठडे तोडून नदीत कोसळली. यात शालेय विद्यार्थ्‍यांस‍ह 20 प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्‍यान, परिसरातील नागरिकांनी प्रवाशांना बाहेर काढण्‍याची मदत केली. जखमीवर पुसद ग्रामीण रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत. खड्डा चुकवण्‍याच्‍या नादात हा अपघात झाल्‍याचे कळते. या बसमध्ये शालेय विद्यार्थ्यांसह सुमारे ६० प्रवासी होते.
पुढील स्‍लाइड्वर पाहा अपघाताची भीषणता दर्शवणारे फोटोज..