आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी बस-टिप्पर अपघातात १६ जखमी, जखमींवर इर्विनमध्ये उपचार सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- अमरावतीवरून चांदूर रेल्वेच्या दिशेने जाणारी अहेरी आगाराची भरधाव बस विरुद्ध दिशेने वाळू घेऊन येणारा टिप्पर यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एसटीच्या चालक, वाहकांसह १६ प्रवासी जखमी झाले. त्यापैकी आठ जणांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर इर्विनमध्ये उपचार सुरू आहेत. हा अपघात सोमवारी (दि. १) चांदूर रेल्वे मार्गावरील बासलापूर गावाजवळ घडला.

गंभीर जखमींमध्ये बसचालक बालाजी लक्ष्मण सोयाम (३५, रा. अहेरी),बसचे वाहक गंगाधर सुखदेवराव लाड (३०, रा. अहेरी), उषा राजू शिरसाठ (३५, प्रबुद्धनगर, वडाळी), प्रदीप महादेव शिंदे (३२, रा. तिवरा), सुंदरबाई महादेवराव शिंदे (६२, रा. तिवरा),नितेश कन्हैय्यालाल वादवानी (३५, रा. नानकनगर, अमरावती), उत्तम जयरामजी ठाकरे (६०, रा. चांदूर रेल्वे) आणि संध्या भीमरावजी इंगोले (४५, रा. वरोरा) या आठ जणांचा समावेश असून,अन्य आठ जण किरकोळ जखमी झाले आहे.

अहेरी आगाराची एम. एच. ४० एक्यू ६२४२ क्रमांकाची बस अहेरीवरून अमरावतीला आली होती. अमरावतीवरून चांदूर रेल्वे मार्गाने परत अहेरीला जात असताना चांदूररेल्वेच्या किलोमीटर अलीकडे बासलापूर गावाजवळील चमकुरा हॉटेलजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या टिप्परसोबत बसची समाेरासमोर धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, बसचा दर्शनी भागाचा चक्काचूर झाला होता. बसचे चालक सोयाम यांचे पाय त्यामध्ये फसले होते. अपघातानंतर नागरिकांनी त्यांना कसेबसे बाहेर काढले. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये २५ ते ३० जण प्रवास करत होते. त्यापैकी जवळपास १६ प्रवाशांना दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सर्व जखमींना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे अमरावतीला रवाना केले. तर किरकोळ जखमींना चांदूर रेल्वे येथील शासकीय खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर चांदूर रेल्वे पोलिसांनीसुद्धा घटनास्थळ गाठले होते. मात्र पोलिस घटनास्थळी पोहचण्यापूर्वीच टिप्परचालक घटनास्थळावरून पसार झाला होता. बस टिप्पर या दोन्ही वाहनांची गती सुसाट असल्याचे काही प्रत्यक्षदर्शी बसमधील प्रवासी सांगत होते.

एसटीकडूनजखमींना आर्थिक मदत : अपघातझाल्याची माहिती मिळताच एसटीचे विभागीय वाहतूक अधिकारी अरुण सिया अन्य अधिकारी, कर्मचारी तातडीने इर्विनमध्ये दाखल होऊन त्यांनी सर्व जखमींची विचारपूस करून त्यांना तातडीची आर्थिक मदत केली. जखमी बसचालक आणि वाहक हे अहेरी येथील असल्याने त्यांचे नातेवाईक वृत्त लिहिस्तोवर शहरात पोहोचले नव्हते.

अपघात वाढले
सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांना अपघात होण्याचे प्रमाण अलीकडे वाढीस लागल्याचे दिसून येत आहे.

भरधाव टिप्पर चालकांचा शोध सुरू
^अमरावतीतेचांदूर रेल्वे मार्गावरील चमकुरा हॉटेलजवळ बस टिप्पर यांच्यामध्ये अपघात झाला.यामध्ये जवळपास १५ ते १६ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. बहुतांश जखमींना अमरावतीला उपचारासाठी पाठवण्यात आले तर एका महिलेवर चांदूर रेल्वेच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. टिप्पर चालक घटनास्थळावरून निघून गेला होता. त्याचा शोध सुरू आहे. गिरीषबोबडे, ठाणेदार, चांदूर रेल्वे.
बातम्या आणखी आहेत...