आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाइट क्लबमधून सुरू झाली या अब्‍जाधिशाची LOVE STORY, 8 वर्षे केली डेटिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - रेमंड ग्रुपचे मालक गौतम सिंघानिया नागपूरमध्‍ये 1500 कोटी रुपयांचे टेक्सटाइल प्लांट उभारणार आहेत. त्‍यांच्‍या कॉरपोरेट लाइफ इतकेच त्‍यांचे खासगी आयुष्‍यही रंजक आहे. एका नाइट क्‍लबमध्‍ये कारवर चर्चा करताना ते नवाज (त्‍यांची पत्‍नी) हिला पहिल्‍यांदा भेटले आणि तिच्‍या प्रेमात पडले. 8 वर्षे डेटिंगनंतर दोघांनी लग्‍न केले.
लग्‍नासाठी का लावले आठ वर्षे ?
गौतम सिंघानियांची पत्नी नवाज पारसी आहे. गौतम यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका पारसी मुलीला बायको बनण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. मात्र, त्यांच्या वडिलांनी त्‍यांना सहकार्य केले. ते म्हणाले, लग्न करण्यासाठी प्रेम आवश्यक आहे. मग ते कोणावरही का प्रेम केले असे ना.. वडिलांच्या होकारानंतर त्यांचे लग्न झाले.
अशी झाली पहिली भेट
गौतम आणि नवाज यांची भेट मुंबईतील एका नाईट क्लबमध्ये झाली. कारवरून सुरू झालेल्या गप्पांमध्ये संपूर्ण रात्र कशी निघून गेली कळालेच नाही. लग्नाआगोदर हे दोघे 8 वर्षांपर्यंत मित्र होते. नवाजच्या वडिलांनी लग्नाला नकार दिला. मात्र, त्यांच्या लाडक्या मुलीसमोर शेवटी त्यांनी हार मानली. लग्नानंतर सांस्कृतिक अंतर असल्याने नवाज आणि गौतम यांना अनेक तडजोडी कराव्या लागल्या.
जाणून घ्या त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या फॅक्टस
- 2005 मध्ये त्यांनी वांद्रे येथे ‘प्वाइजन’ नावाने एक नाईट क्लब उघडले.
- महाराष्ट्रातील अलिबाग येथे त्यांचे एक फार्म हाऊस आहे, जेथे ते वर्षातून एकदातरी आपल्या मित्रांसमवेत, कुटुंबियांसमवेत जातात.
- गौतम यांना लहानपणापासूनच कारची आवड आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन त्यांच्या वडीलांनी त्यांना 18 व्या वाढदिवसादिवशी Premier Padmini 1100 कार भेट दिली होती.
- बॉलीवुड एक्ट्रेस रविना टंडन हिची सिंघानिया कुटुंबियांशी चांगली मैत्री आहे.
- गौतम सिंघानिया यांची पत्नी नवाज एक कलाकार आहे आणि मुंबईच्या आर्ट गॅलरीत त्यांनी अनेक प्रदर्शने भरवली आहेत.

पुढील स्लाइड्सवर, पाहा गौतम आणि नवाज यांचे काही निवडक फोटोज...