आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुण व्यावसायिकाची कारमध्ये स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- चंद्रपूर जिल्ह्यातील तरुण व्यावसायिक पदम जैन यांनी आपल्या कारमध्ये स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. जैन यांच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी आर्थिक विवंचनेतून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असल्याची चर्चा आहे.   

व्याजाने पैसे देण्यासह जैन यांचा पेव्हर ब्लॉक तयार करण्याचाही व्यवसाय होता. मागील काही दिवसांपासून ते आर्थिक संकटात असल्याचे बोलले जाते. शुक्रवारी दुपारी ते कार घेऊन घराबाहेर पडले. त्यांनी सोबत आपले पिस्तूल नेले होते. सायंकाळी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा मोबाइल फोन बंद असल्याचे आढळून आले. रात्री उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने अखेर कुटुंबीयांनी चंद्रपूर पोलिस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार दिली होती. शनिवारी सकाळी म्हाडा कॉलनीतील रस्त्यावर उभ्या कारमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांनी स्वत:वर गोळ्या झाडून घेतल्याचे आढळून आले. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या मित्रमंडळींची चौकशी केली.
बातम्या आणखी आहेत...