आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्‍ट्र : अनैतिक संबंधातून मोठ्या बहिणीने आवळला धाकटीचा गळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुसद (यवतमाळ) – लहान बहिणीच्‍या नव-यासोबत असलेले अनैतिक संबंध तिला माहिती पडल्‍याने मोठ्या बहिणीने लहान बहिणीचा गळा आवळून खून केल्‍याचा प्रकार तालुक्‍यातील पांढुर्णा येथे उघडकीस आला. अश्विनी प्रेम राठोड असे मृत महिलेचे नाव आहे. अश्विनी हिचे तिनच महिन्‍यापूर्वी लग्‍न झाले होते. दरम्‍यान, तिच्‍या घरी तिची मोठी बहीण छाया आली. आश्विनी ही बाहेर गेल्‍याची संधी पाहून प्रेम व छाया एकत्र आले. परंतु, अश्विनी लवकरच घरी परतल्याने तिने नको त्या अवस्थेत आपली बहीण व पतीला एकांतात पाहिले. त्‍यामुळे तिच्‍या संतापाचा पारा चढला. दरम्‍यान, प्रेमने अश्विनीला घरात ओढले आणि छायाने तिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला व गळा दाबून तिची हत्या केली. नंतर वायर गळ्याभोवती बांधून विजेच्‍या झटक्‍याने अश्विनीचा मृत्‍यू झाला असे भासवले. या प्रकरणी पुसद ग्रामीण पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे.
दिवसभरात राज्‍यात घडलेल्‍या घडामोडी वाचण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा