आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती: महामार्गावर कार जळून खाक, बिझीलँड जवळ घडली घटना, जिवीतहानी नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदगांव पेठ- अमरावतीकडे जाणाऱ्या भरधाव इंडिका कारने बिझीलँड जवळ अचानक पेट घेतला. बुधवारी रात्री घडलेल्या या घटनेत इंडिकाचा जळून कोळसा झाला तर काही वेळ महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती.एम एच २७, सी ८०२४ या क्रमांकाची इंडिका नांदगांव पेठ टोल नाका ओलांडून सायंकाळी साड़े सात वाजता अमरावतीकडे भरधाव जात असतांना बिझीलँड जवळ अचानक कार ने पेट घेतला.काही कळायच्या आत चालक आणि इतर प्रवास्यांनी कार मधून ताबडतोब उड्या घेतल्या मात्र तोपर्यन्त कार आगीच्या तावडीत सापडली.नांदगाव पेठ पोलिसांनी घटनेची दखल घेऊन त्वरित अग्निशमन दलाला पाचारण केले आग आटोक्यात आणली मात्र कारचा संपूर्ण कोळसा झाला . मात्र जिवीतहानी झाली नाही. घटनेने महामार्गावर काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. नांदगाव पेठ पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे. 
बातम्या आणखी आहेत...