आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भांडाफोड : दारूच्‍या चोरट्या वाहतूकीसाठी अशी डिझाईन केली इंडिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंद्रपूर - जिल्‍ह्यात दारूबंदी असल्‍यामुळे दारूच्‍या वाहतूकीसाठी तस्‍कर कोणती शक्‍कल लढवतील सांगता येणार नाही. चंद्रपूरात काही दिवसांपूर्वी गॅस सिलिंडरमधून दारूची तस्करी करणाऱ्या एका महाभागाला घुग्घूस पोलिसांनी अटक केली होती. आता चक्‍क दारूच्‍या वाहतूकीसाठी कारचे खास डिझाईनच तयार करण्‍यात आले आहे. चोरट्या वाहतूकीवर डोळा ठेऊन असलेल्‍या पोलिसांनी या तस्‍करीचा भांडाफोड केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने दारू वाहतूकीसाठी बनवलेली ही खास कार जप्‍त केली आहे.
अशी बनवली कार
कारमधून दारूची वाहतूक केल्‍यास कुणी संशय घेणार नाही म्‍हणून चंद्रपूरात तस्‍कर कारचा वापर करतात. पण काही दिवसांपासून पोलिस हा डावही उलथून टाकत आहेत. त्‍यामुळे आता दारू तस्‍करांनी नवीन शक्‍कल लढवत या इंडिकाची खास दारूच्‍या वाहतूकीसाठी डिझाईन तयार केली आहे.
- इंडिका कारच्या सीट्स आणि इतर भागात दारूच्‍या बाटल्‍या ठेवण्‍यासाठी कप्पे तयार करण्यात आले आहेत.
- सिट्खाली दारूच्‍या बाटल्‍या असतील असा संशयही कोणाला येणार नाही अशी वाहनाची बनावट आहे.
- प्रवासी वाहतूक करणा-या वाहनांमध्‍येही अशी शक्‍कल लढवली जात असल्‍याचा संशय आहे.
खब-याने दिली माहिती
अवैध दारू वाहतूक होत असल्‍याची माहिती खब-याने पोलिसांना दिली. त्‍यानुसार पोलिसांनी खंजर मोहल्ला भागातून एक आरोपी व ही गाडी जप्त केली आहे. या इंडिकामध्‍ये सुमारे 75 हजार रूपयांची दारू होती. नागपूरातून ही दारू शहरात आणल्‍या जात होती.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, अशी केली इंडिकाची खास डिझाईन..