आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Careless Action Washim Civil Surgen Dr.Surekha Mendhe Suspended

हयगय भोवली; वाशीमच्या सिव्हिल सर्जन डॉ. सुरेखा मेंढे यांचे निलंबन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाशीम - जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेखा मेंढे आणि सामान्य रुग्णालयातील नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत चव्हाण यांना नेत्र रुग्णांची हेळसांड भोवली आहे. बुधवार, नोव्हेंबर रोजी दोघांनाही सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. आरोग्य विभागाचे उपसचिव रा. शं. जाधव यांच्या स्वाक्षरीने आदेश जारी करण्यात आला आहे.

आदेश अमलात असेल त्या काळात डॉ. मेंढे यांचे मुख्यालय जिल्हा शल्यचिकित्सक सामान्य रुग्णालय यवतमाळ येथे राहील. सक्षम अधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही. डॉ. मेंढे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकपदाचा कार्यभार डॉ. जनार्दन जांभरुणकर, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा रुग्णालय, वाशीम यांच्याकडे सोपवून तत्काळ कार्यमुक्त व्हावे आणि निलंबन कालावधीतील मुख्यालयी रुजू व्हावे, असे आदेशात म्हटले आहे. तसेच डॉ. प्रशांत पंजाबराव चव्हाण यांचे निलंबन काळातील मुख्यालयदेखील यवतमाळ राहणार आहे. पूर्वपरवानगीशिवाय त्यांनाही मुख्यालय सोडता येणार नाही. डॉ. चव्हाण यांनी पदाचा कार्यभार डॉ. संतोष रामगोपाल सारडा, वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे सोपवून तत्काळ कार्यमुक्त व्हावे, तसेच निलंबन कालावधीतील मुख्यालयी रुजू व्हावे, असा आदेश देण्यात आला आहे.

वाशीम जिल्हा सामान्य रुग्णालयात २८ सप्टेंबर २०१५ पासून जवळपास १७१ रुग्णांवर नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यातील काही रुग्णांना इन्फेक्शन झाल्यामुळे त्यांना मुंबई येथील जे. जे. हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. यामध्ये जवळपास ५० रुग्णांचे डोळे निकामी होण्याची शक्यता आहे. सदर प्रकरण कळताच आमदार राजेंद्र पाटणी यांनी तत्काळ मुंबई गाठून नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता जे. जे. हॉस्पिटलमधील उपचारार्थ दाखल रुग्णांची आस्थे विचारपूस केली. या वेळी जे. जे. हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांची भेट घेऊन रुग्णांना झालेल्या इन्फेक्शनबाबत माहिती घेतली. झालेला प्रकार हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री दीपक सावंत यांना लेखी निवेदन दिले. संबंधित प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करून जिल्हा शल्यचिकित्सक वाशीम संबंधित डॉक्टरांना तातडीने निलंबित करण्याची मागणी केली होती.

१४० रुग्णांची तपासणी
वाशीमयेथील जिल्हा स्त्री रुग्णालयात सदोष नेत्र शस्त्रक्रिया झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या प्रकरणाची दखल आरोग्य संचालकांनी घेतली. नेत्र शस्त्रक्रिया झालेल्या सर्व १४० रुग्णांची फेरतपासणी करण्याचे आदेश त्यांनी आरोग्य विभागाला दिले. त्यानुसार अकोल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामचंद्र गिरी यांच्या मार्गदर्शनात वाशीम हिंगोली जिल्ह्यातील सर्व रुग्णांचा शोध घेऊन फेरतपासणी करण्यात येत आहे. नेत्र दोष असलेल्या रुग्णांना परत शस्त्रक्रियेसाठी संदर्भित केल्या जात असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामचंद्र गिरी यांनी सांगितले.