आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शौचालयप्रकरणी 11 लाभार्थ्यांवर गुन्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम करता अनुदानाचा गैरवापर करणाऱ्या पूर्व झोन कार्यालय अंतर्गत वडाळी किरण नगर प्रभागातील एकूण ११ लाभार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शौचालयाच्या बांधकामाकरीता महापालिकेकडून ८५०० रुपये अनुदान घेण्यात आले. मात्र अनेक महिन्यांपासून शौचालयाचे बांधकाम केलेच नसल्याचे प्रशासनाला आढळून आले. 

शासनाच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत शहरातील ज्या नागरिकांकडे वैयक्तिक शौचालय नाही अश्या नागरिकांना या योजनेअंतर्गत शौचालय बांधकाम करण्याकरीता ८५०० रुपयांचे अनुदान देण्यात आले. मात्र महापालिकेच्या पूर्व झोन क्रमांक हमालपूरा कार्यालय अंतर्गत ३०८७ लाभार्थ्यांना प्रथम टप्पातील शौचालय अनुदान वाटप करण्यात आले. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या लाभार्थ्यांमध्ये माया भगवान सरवरे, शेख मुस्तफा शेख मेहबुब, लिला मांगीलाल शेरवाने, सुधीर देवराव वानखडे, शकीला बी शेख हनिफ, मायासिंग अमृतसिंग टांक, दादासिंग अजाबसिंग टांक, अर्चना निलेश मेटे, अशोक किसन वानखडे यांचा तर किरण नगर प्रभागातील बळीराम प्रभाकर रोडगे देवानंद जंगलूजी गोंडाणे यांचा समावेश आहे. 
बातम्या आणखी आहेत...