आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने पुसद नगरपालिकेतील पाच नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द होण्याची शक्यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुसद (यवतमाळ)- विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने पुसद नगरपालिकेतील पाच नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द होण्याची शक्यता आहे. यात राष्ट्रवादीचे 3, शिवसेनाचा 1 व भाजपचा 1 अशा 5 जणांचा समावेश आहे.
 
महाराष्ट्र नगरपालिका, नगर पंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 कलम 9 अ नुसार ही कारवाई होणार आहे. या संदर्भातील अहवाल पालिकेचे मुख्याधिकारी अजय कुरवाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. यावर जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकड़े सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयानंतर अपात्र झालेले काही नगरसेवक न्यायालयात दाद मागणार आहेत. 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...