आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सीबीएसई पॅटर्न’लिहिल्यास कारवाई , खासगी शाळांवर राहणार अभ्यासक्रमांचे फलक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - सीबीएसई पॅटर्न लिखित शाळांवर शिक्षण विभागाकडून कारवाई केली जाणार आहे. शिकविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमाचे फलक खासगी शाळांमध्ये लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. फलक लावण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक एस. बी. कुळकर्णी यांनी दिले आहे. सीबीएसई बोर्डाची संलग्नता नसताना पॅटर्नच्या नावाखाली पालकांची फसवणूक लूट होत असल्याने शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.
सीबीएसई बोर्डाची संलग्नता असलेल्या जिल्ह्यात मोजक्याच शाळा असल्याचे वास्तव दिव्य मराठीने उघड केले. सीबीएसई पॅटर्नच्या नावाखाली अनेक शाळांकडून सुरू असलेला हा प्रकार पालकांसमोर आला. शिक्षणाधिकारी डॉ. श्रीराम पानझडे यांनी देखील सीबीएसई पॅटर्न शाळांवर शिस्तभंगाची कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. विद्यार्थी मिळवित मोठा नफा कमविण्याच्या उद्देशाने अनेकांना प्रवेश दिले जातात. अटी शर्ती पूर्ण करण्यात कमी पडल्यास सीबीएसई बोर्डाची संलग्नता मिळत नाही, त्यात विद्यार्थ्यांचे काही वर्गातील शिक्षण पूर्ण होऊन जाते. मात्र दहावीची परीक्षा घेण्यास बोर्डाची संलग्नता घेणे गरजेचे आहे. सीबीएसई बोर्डाची संलग्नता मिळाली नसल्याने नाईलाजास्त शाळेवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच राज्य शिक्षण मंडळाची संलग्नता घेण्याची वेळ येते. शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम शिकविला जातो, तर परीक्षा राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमानूसार घेतली जाते.

हवी अपडेट माहिती: सीबीएसईबोर्डाची संलग्नता असलेल्या शाळांची परिपूर्ण माहिती शिक्षण विभागाकडे असणे गरजेचे आहे. खासगी आस्थापनांच्या शाळांची संख्या जास्त असल्याने कोणत्या शाळेला कोणत्या बोर्डाची संलग्नता आहे, याबाबत पालकांना परिपूर्ण माहिती नसते. बोर्डाच्या संलग्नतेबाबत कमालीची गोपनियता बाळगली जाते.

फलक लावावे
^सीबीएसईपॅटर्नच्या नावाखाली पालकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. पालकांची फसवणूक होऊ नये म्हणून सर्व खाजगी शाळांमध्ये शिकविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमाबाबत माहिती देणारे फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. याचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई केली जाईल. एस.बी. कुळकर्णी, शिक्षण उपसंचालक

पत्त्याच्या चुकीने पोदार यादीतून बाहेर
कठोरानाका स्थित पोदार इंटरनॅशनल स्कूलला सीबीएसई बोर्डाची संलग्नता प्राप्त आहे. मात्र सीबीएसई बोर्डाच्या संकेतस्थळावरील राज्यातील ६७० शाळांच्या यादीत पोदार स्कूलचे नाव दिसून येत नाही. सीबीएसई बोर्डाच्या संकेतस्थळावर असलेल्या पत्तामुळे शाळा दर्शविल्या जात नसल्याचे प्राचार्यांचे म्हणणे आहे. मात्र संलग्नता क्रमांक टाकल्यानंतर पोदार स्कूलला सीबीएसईची संलग्नता दाखवते.

बातम्या आणखी आहेत...