आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरात सिमेंट व्यापाऱ्याला खंडणीसाठी धमकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - मुलांचा जीव वाचवायचा असल्यास २० लाखांची खंडणी द्या, अशी धमकी नागपुरातील सिमेंट व्यापाऱ्याला मिळाल्याने खळबळ उडाली आहे. गेल्याच महिन्यात पावणेदोन कोटी रुपयांच्या खंडणीच्या प्रकरणाचा तपास अद्याप लागला नसताना हे प्रकरण समोरआल्याने पोलिसांनी ताराबंळ उडाली आहे.

नागपुरात सदर परिसरातील नवीन कॉलनी येथे राहात असलेले कुंजबिहारी टेकडीवाल यांचा सिमेंटचा व्यवसाय आहे. शुक्रवारी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरी चिठ्ठी टाकली. त्यात मुलांचा जीव वाचवायचा असल्यास २० लाखांची खंडणी द्या, अशी धमकी देण्यात आली आहे. पैसे न मिळाल्यास दोन्ही मुलांना गमवावे लागेल, असेही त्या चिठ्ठीत म्हटले आहे. या चिठ्ठीमुळे हादारलेल्या टेकडीवाल कुटुंबीयांनी लगेच सदर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. अलिकडे घडलेल्या काही घटना लक्षात घेता पोलिसांनी ही चिठ्ठी अतिशय गांभीर्याने घेतली आहे.
गेल्याच महिन्यात नागपुरात बिल्डरचे अपहरण करून अपहरणकर्त्यांनी सुमारे पावणेदोन कोटींची खंडणी वसुली केल्याची खळबळजनक घटना घडली होती. या घटनेतील आरोपी अद्यापही पोलिसांना सापडले नाहीत.
बातम्या आणखी आहेत...