आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राध्‍यापक रागावल्‍याने विद्यार्थीनीची आत्‍महत्‍या, वाचा तिचे शेवटचे पत्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंद्रपूर - जिल्‍ह्यातील ब्रह्मपुरी येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाची विद्यार्थीनी स्‍वाती निकुरे हिने आत्‍महत्‍या करून जीवन संपवले. आत्‍महत्‍येपूर्वी तिने लिहीलेल्‍या चिठ्ठीनुसार शिक्षक आणि दोन सहकारी मित्रांना पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे. या घटनेला आठवडा उलटला तरी पालक आणि विद्यार्थ्‍यांमध्‍ये संतापाची लाट कायम आहे. सोशल मीडियावर स्‍वातीने लिहीलेली चिठ्ठी शेयर होत आहे. या प्रकरणामुळे विद्यार्थिनीच्‍या सुरक्षेची गंभीरता अधिकच वाढली असल्‍याचे दिसून येत आहे. पोलिसांनी तिनही आरोपींना नुकतेच ताब्‍यात घेतले आहे.
काय आहे प्रकरण
चंद्रपूर शेजारच्या चिंचाळा या खेडेगावातील गरीब कुटुंबातील मुलगी स्‍वाती निकुरे ही शासकीय तंत्रनिकेतनच्‍या तृतीय वर्षात, ब्रम्हपुरी येथे शिक्षण घेत होती. 20 वर्षीय स्‍वातीने मागील आठवड्यात ब्रम्हपुरी येथे राहत्‍या रूमवर गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहीलेल्‍या चिठ्ठीत तिने एक प्राध्‍यापक आणि 2 सहकारी मित्रांचा उल्‍लेख केला आहे. या तिघांविरूद्ध पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे.
काय लिहीले चिठ्ठीत
४ आॅक्टोबरच्या रात्री १२ वाजून ४ मिनिटांनी स्वातीने आत्‍महत्‍या करण्‍यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली. त्‍यामध्‍ये तिने लिहीले की, ‘मेश्राम सर, माझ्याऐवजी तुम्ही तुमच्या मुलीला ठेवून बघा, तर तिलाही माझ्यापेक्षा जास्त दु:ख होईल, अशी तुमची भाषा होती. या दु:खामध्ये शाहरुख अली सय्यद व रजत जिभकाटे हे तेवढेच कारणीभूत आहेत. माझ्या संपूर्ण आयुष्यात असे बोललेले मी कधी ऐकलेले नाही. त्यामुळे मला ते सहन होत नाही. कॉलेजमध्ये जाण्याची हिंमत माझ्यामध्ये राहिलीच नाही. सॉरी आई बाबा मी तुमचे स्वप्न साकार करु शकत नाही. तुमचीच (नमू) स्वाती निकुरे’ असा स्‍पष्‍ट उल्लेख केला आहे. ही चिठ्ठी सध्‍या सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात शेयर केले जात आहे.
ब्रम्हपुरी पोलिसांना आरोपी गवसले
या प्रकरणातील रजत जीभकाटे व शाहरुख़ अली सय्यद या दोन्‍ही आरोपींना भांड-यातुन पोलिसांनी अटक केले आहे. आरोपी शिक्षक सुहास मेश्राम याने वकिलाच्या उपस्‍थितीत ब्रम्हपुरी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. सध्‍या सर्व आरोपी न्‍यायालयीन कोठडीत अाहेत. उशीरा का होईना या आरोपींना पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे. त्‍यामुळे त्‍यांना जबर शिक्षा व्‍हावी अशी मागणीही होत आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, अात्‍महत्‍येपूर्वी लिहीलेली चिठ्ठी व संबंधित फोटो..