आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चव्हाण, राणे, विखे हे तर काँग्रेसचे उपटसुंभ नेते - मुत्तेमवारांनी स्वपक्षीयांनाच सुनावले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ‘माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे आणि राधाकृष्ण विखे पाटील या उपटसुंभ नेत्यांनी राज्यात काँग्रेस बुडविण्याचे काम केले. त्यांना विधिमंडळात विदर्भाच्याविरोधात आणि संयुक्त महाराष्ट्राच्या समर्थनात भूमिका घेण्याचा अधिकार कुणी दिला? त्यांचे विदर्भाशी काहीही घेणेदेणे नाही. त्यांनीच आम्हाला लुटले’, या शब्दात माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत आणि डॉ. सतीश चतुर्वेदी या विदर्भवादी काँग्रेस नेत्यांनी मंगळवारी आपल्याच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा समाचार घेतला.
नागपुरात पत्रकारांशी बाेलताना या तिन्ही काँग्रेस नेत्यांनी स्वतंत्र विदर्भाच्या समर्थनार्थ भूमिका मांडली. तसेच विदर्भविरोधी आणि संयुक्त महाराष्ट्रवादी भूमिका घेणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांच्या विरोधात हायकमांडकडे तक्रार करू, असा इशाराही दिला. काँग्रेस हायकमांडने कधीही विदर्भाच्या विरोधात भूमिका घेतली नाही. पक्षाचे तसे धोरणही नाही. असे असताना चव्हाण, राणे, विखे यांनी परस्पर शिवसेनेच्या संयुक्त महाराष्ट्रवादी भूमिकेला पाठिंबा देऊन विदर्भविरोधी भूमिका घेतली. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. या उपटसुंभ, स्वयंघोषित नेत्यांना ही भूमिका घेण्याचे अधिकार दिले तरी कोणी? या नेत्यांचे विदर्भाशी काहीही घेणे-देणे नाही. या नेत्यांनीच आम्हाला (विदर्भाला) लुटले, असा संताप मुत्तेमवार यांनी व्यक्त केला.

‘चव्हाण, राणे हे नेते सत्तेशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे ते शिवसेनेशी जवळीक साधत अाहेत. केवळ विदर्भाने दिलेल्या पाठबळाच्या आधारे या नेत्यांना मुख्यमंत्री होता आले आहे. हे या नेत्यांनी लक्षात ठेऊन विदर्भाच्या जनतेशी विश्वासघात करू नये. विदर्भाबाबत निर्णयाचा अधिकार येथील नेते व जनतेला आहे. त्यात बाहेरच्यांनी पडू नये,’ असेही त्यांनी सुनावले.

फडणवीसांनी खंजीर खुपसला
विदर्भ राज्याच्या मागणीचे समर्थन करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता येताच विदर्भाच्या जनतेच्या पाठित खंजीर खुपसल्याची टीकाही विलास मुत्तेमवार, नितीन राऊत व डाॅ. सतीश चतुर्वेदी या नेत्यांनी केली. ‘बोले तैसा चाले’ ही फडणवीस यांची प्रतिमा त्यांच्या विसंगत भूमिकेमुळे धुळीस मिळाली आहे. ते पुरते एक्स्पोज झाले आहेत. विदर्भाबाबत भाजपची भूमिका दुटप्पी असून विदर्भातील जनताच त्यांना धडा शिकवेल, असा इशाराही त्यांनी दिला.
बातम्या आणखी आहेत...