आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरिबांच्या ताटातील ८० क्विंटल धान्य गायब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चांदूर बाजार - तालुक्यातीलकाजळी येथील Cheaper grain shopतून वाटपासाठी गोदामातून उचल केलेले सुमारे ८० क्विंटल ५० किलो धान्याचे लाभार्थ्यांना वाटपच केले गेले नसल्याची बाब तालुका पुरवठा अधिकाऱ्यांच्या चौकशीतून समोर आली अाहे. त्यामुळे गरिबांच्या ताटातील धान्य नेमके गेले कुठे, हा प्रश्न अद्याप कायम आहे. दरम्यान, याबाबतचा अहवाल सोमवारी (दि. ११) तहसीलदारांना सादर करण्यात आला आहे.
काजळी येथे धान्याचे वाटप होत नसल्याची तक्रार तालुका पुरवठा विभागाकडे आली होती.या तक्रारीची दखल घेऊन तालुका पुरवठा अधिकारी रूपाली सोळंके यांनी एप्रिल रोजी गावात जाऊन दुकानाच्या रेकॉर्डची तपासणी केली असता दुकानदाराने मार्च रोजी सुमारे ८० क्विंटल ५० किलो धान्याचे पासिंग करून संबंधित धान्याची उचल २९ मार्च रोजी केल्याचे आढळून आले आहे. परंतु, धान्याचे वाटपच केले नसल्याचे लाभार्थ्यांचे म्हणणे होते. दरम्यान, याप्रकरणी नेमके काय झाले, हे जाणून घेण्यासाठी सोमवारी काजळी येथील लाभार्थ्यांनी तालुका पुरवठा अधिकारी तहसीलदारांची भेट घेतली. दुकानदाराने उचल केलेल्या धान्यात एपीएलचा गहू २२.८९ क्विंटल, तांदूळ १५.२६ क्वि., अंत्योदय अंतर्गत गहू १३.२० क्विंटल, तांदूळ ९.९० क्विं., बीपीएल अंत्योदय अंतर्गत साखर ३.८० क्विं., शेतकऱ्यांसाठी असलेले गहू ८.८७ क्विं., तांदूळ ६.५८ अशा एकूण ८०.५० क्विंटल धान्याचा समावेश आहे. दरम्यान, सोळंके यांनी केलेल्या तपासणीत दुकानदाराने धान्याचे वाटप केले असल्याचे आढळून आले आहे. परंतु, लाभार्थ्यांच्या कार्डवर मार्च महिन्यातील नोंदी आढळून आल्या नसल्याचे सोळंके यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांिगतले. तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी योग्य कारवाई करण्याचे आश्वासन लाभार्थ्यांना दिले. या वेळी राहुल फुसे, अमोल टिंगणे, मोहन कपले, गौतम यावले, नारायण थोराईत, सुधाकर थोराईत, मुकेश देशमुख, पंकज पोटे, प्रवीण निचत, राजू निचत, पुंडलिक कुऱ्हाडे, सचिन देशमुख, संकेत पापडकर, जानराव ठाकरे आदी लाभार्थी उपस्थित होते.

कार्डवर नोंदी नाहीत
^आम्ही गावात चौकशी केली असता गावकऱ्यांच्या कार्डवर रेशन उचल केल्याची नोंद नसल्याचे दिसून आले. त्यानंतर दुकानाची तपासणी केली असता मार्च महिन्याच्या वाटपाची नोंद आढळून आली. त्यामुळे नेमके धान्य गेले कुठे, हा प्रश्न आहे. या प्रकरणाचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. रूपाली सोळंके, तालुकापुरवठा अधिकारी, चांदूर बाजार.