आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केमिस्टच्या परवाना शुल्कामध्ये दहापट वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - औषध विक्रीचे दुकान सुरू करण्यासाठी अावश्यक असलेल्या परवान्याकरिता जुना परवाना नूतनीकरणाकरिता सध्या माेजावे लागत असलेले तीन हजार रुपयांचे शुल्क तब्बल दहापट वाढवून ते तीस हजार रुपये केले जाणार अाहे. या दरवाढीचा निर्णय केंद्र शासनाने घेतला असून, येत्या काही दिवसांत त्याची अंमलबजावणी होणार अाहे. या दरवाढीविरोधात अमरावती जिल्हा केमिस्ट ड्रगिस्ट संघटना आक्रमक झाली असून, या दरवाढीला विरोध दर्शवत संबंधित विभागाला निवेदन देण्यात येणार असल्याचे संघटनेने सांगितले.

दरम्यान, फार्मासिस्ट दुकानात कायम उपलब्ध असावा, यासारख्या विविध निर्बंधांनी अगाेदरच बेजार असलेल्या केमिस्टला अाता नवा अार्थिक फटका सहन करावा लागणार अाहे. परवान्यासाठी थेट दहापट केलेली वाढ ही परवडणारी आहे. ही वाढ दुप्पट किंवा फार-फार तर तिप्पट ठीक आहे, परंतु थेट दहापट हे चुकीचे आहे. सन २००० पर्यंत परवान्याकरिता ८० रुपये शुल्क माेजावे लागत हाेते. त्यानंतर मात्र ते ३००० रुपये करण्यात अाले हाेते. सध्या केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार सन २०१६ पासून ते ३० हजार रुपये केले जाणार अाहे. ही वाढ तब्बल दहापट असल्याने परवडणारी असल्याचे केमिस्टचे म्हणणे अाहे. या निर्णयामुळे मात्र अाैषध विक्रेत्यांकडून संताप व्यक्त केला जात असून, त्यांच्या संघटना राष्ट्रीयस्तरावर कडाडून विराेध करण्याच्या तयारीत अाहेत. अमरावती जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेने या दरवाढीचा तीव्र विरोध केला असून, यासंदर्भात संबंधित विभागाचे मंत्री स्थानिक अन्न आैषध प्रशासन विभागाला निवेदन देण्यात येणार आहे. दुकानात चाेवीस तास फार्मासिस्ट अाणि अाॅनलाइन रजिस्ट्रेशनचा सध्या विराेध सुरूच अाहे. त्यातच अाता हा नवा शासनाच्या वतीने निर्णय घेण्यात अाला असून, ताे अनेकांना डोकेदुखी ठरणारा आहे. दरम्यान, अाैषध विक्रीचे दुकान थाटण्याकरिता घ्यावा लागणाऱ्या परवान्याकरिता फाॅर्म २० अाणि २१ भरावा लागताे. ठाेक विक्रीकरिता फाॅर्म २० बी अाणि २१ बी भरावा लागताे. या प्रत्येक अर्जाकरिता अाता तीनएेवजी तीस हजार रुपये भरावे लागणार अाहे.

पुढे काय?
छाेट्या अाैषध विक्रेत्यांवर या निर्णयाचा विपरीत परिणाम हाेणार अाहे. फी वाढीचा मुद्दा शहरी भागात ठीक आहे. शहरी भागात तेवढा त्यांचा व्यवसाय असतो, परंतु ग्रामीण भागातील केमिस्टसाठी ताे त्रासदायक अाहे. त्यांचा तितक्या प्रमाणात काऊंटर व्यवसाय होत नाही, याचा विचार शासनाने करायला हवा. यामुळे चुकीच्या गाेष्टींचा अवलंब हाेण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम छाेट्या विक्रेत्यांवर होणार आहे. केंद्र सरकारवर छाेटे व्यवसाय अडचणीत अाणून नामांकित माेठ्या कंपन्यांना सहकार्य करण्याचा अाराेप यामुळेच हाेत अाहे.

वाढ भरमसाट
ही वाढ खूप जास्त आहे. दुप्पट वाढ चालली असती, परंतु थेट दहापट वाढ हे चुकीचे आहे. यासंदर्भात संबंधित विभागाला निवेदन देण्यात येईल. याशिवाय राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत या मुद्द्यावर लक्ष वेधण्यात येईल. केंद्राने केलेली ही परवाना फीमधील वाढ सगळ्यांसाठीच अडचणीची अाहे. केमिस्ट संघटनेच्या बैठकीत विषय मांडणार अाहे. शासनाच्या या िनर्णयाला राज्यपातळीवर विराेध केला जाणार अाहे. संजय बोबडे, जिल्हाध्यक्ष,केमिस्ट संघटना.