आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्री तलावही होणार ‘स्मार्ट’, केंद्राच्या ‘नॅशनल लेक्स कन्झर्व्हेशन प्लॅन’ची मदत घेणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- ‘स्मार्टसिटी’च्या दिशेने प्रवासाला निघालेल्या अमरावती शहरातील छत्री तलावाचे रूपही लवकरच बदलणार आहे. यासाठी केंद्र शासनाच्या ‘नॅशनल लेक्स कन्झर्व्हेशन प्लॅन’ची मदत घेतली जाणार असून, त्यासाठीची निविदाही प्रकाशित झाली आहे. तळ्यांचे सौंदर्यीकरण वाढवण्यासाठी (ब्यूटिफिकेशन ऑफ लेक्स) केंद्र शासनातर्फे मदत दिली जाते. सहज आणि लवकर प्राप्त होणाऱ्या या मदतीतून छत्री तलावाचा विकास करण्याची महापालिकेची योजना आहे. त्यामुळे या तलावाला गतवैभव प्राप्त करून देतानाच त्याच्या सौंदर्यात भर पडेल, अशी कृती महापालिकेतर्फे केली जाणार आहे.

महापालिकेच्या पर्यावरण विभागातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या निविदेनुसार मनपा क्षेत्रातील छत्री तलावाचे संवर्धन, मजबुतीकरण सुशोभीकरण करण्यासाठी प्राथमिक प्रकल्प अहवाल (पीपीआर) तयार करावयाचा आहे. शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तयार केला जाणारा हा अहवाल मंजूर झाल्यानंतर पुढे अंतिम प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करून त्यास तांत्रिक आर्थिक मंजुरी मिळवून घेणे आणि प्रकल्प पूर्णत्वास जाईस्तोवर सल्लागार म्हणून सेवा देणे आदी बाबी हाताळल्या जातील. यासाठी मनपास्तरावर एक कन्सलटंट नेमला जाणार असून, त्यासाठीची ई-निविदा जारी करण्यात आली आहे.

देशभरातील निवडक स्मार्ट सिटीमध्ये अमरावतीचा समावेश झाल्याने अमरावतीकरांचा उत्साह वाढला आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेला मूर्तरुप देण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून जय्यत तयारी प्रयत्न केले जात आहेत. छत्री तलावाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सौंदर्यीकरण होणार असून, त्याचे नवे रुपडे पाहायला मिळणार आहे.

छत्री तलावाचे रूप बदलवण्याकरिता पर्यावरण सर्वधनाच्या अटी शर्थीचे पालन करुन केंद्र शासनाच्या राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजनेचा लाभ मिळावा, असा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यासाठी तिसऱ्यांदा निविदा प्रकाशित करण्यात आली आहे. बहुदा या प्रयत्नात अनुभवी एजंसी मिळेल, अशी शक्यता आहे. महेशदेशमुख, पर्यावरण अधिकारी, मनपा.
अनुभवी एजंसीचा शोध
छत्री तलावाचा विकास होत असल्यामुळे वडाळी तलावाकडेही लक्ष द्यावे , असे जनतेचे म्हणणे आहे. त्यामुळे वडाळी तलावाचा विकास व्हावा, यासाठीही प्रयत्न व्हावे, अशी मागणी पुढे येईल.
पुढे काय होणार ?
26 ऑक्टोबरला दुपारी 4 वाजेपर्यंत इच्छुकांकडून मागवण्यात आले आहेत प्रस्ताव.
27 ऑक्टोबरला सायंकाळी 5 वाजता उघडल्या जातील भरलेल्या िनविदा.

तीन मुद्द्यांवर फोकस
छत्री तलावाचे सौंदर्यीकरण करताना तीन मुद्द्यांवर विशेष भर दिला जाणार आहे. यामध्ये तलावातील गाळ काढणे, त्यातील पान वनस्पती बाहेर काढून पाणी स्वच्छ करणे, तलावाचे काठ खचू नये म्हणून तलावाच्या चारही काठांवर दगडांची तटबंदी करणे या कामांचा समावेश आहे. हे करत असताना बोटिंग इतर आनुषंगिक बाबीही पूर्णत्वास नेल्या जातील.

२७ ला उघडणार निविदा
या निविदेनुसार २६ ऑक्टोबरला दुपारी वाजेपर्यंत प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अर्थात इच्छुक फर्मला या कालावधीत त्यांचे दस्तऐवज ऑनलाइन लोड करता येतील. प्राप्त झालेल्या (ऑनलाइन भरल्या गेलेल्या) या सर्व निविदा २७ ऑक्टोबरला सायंकाळी वाजता उघडल्या जातील. त्याच दिवशी हे काम करू इच्छिणारी एजंसी निश्चित होणार आहे. त्यानंतरच सौंदर्यीकरणाला प्रारंभ हाेईल.