आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री, विराेधी पक्षनेत्याच्या गैरहजेरीत मराठा अारक्षणावर चर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर :राज्यात सर्वाधिक माेठी व्हाेट बँक असलेल्या व अापल्या न्याय्य हक्कासाठी लाखाेंच्या संख्येने संघटित झालेल्या मराठा समाजाच्या प्रश्नांविषयी अापल्यालाच कशी कळकळ अाहे हे दाखवण्याची जणू स्पर्धाच गुरुवारी विधानसभेत दिसून अाली. मराठा अारक्षणाची मागणी सत्ताधारी व विराेधक या दाेन्ही बाजूने करण्यात अाली, पण त्यासाठी ठराव मात्र वेगवेगळे मांडण्यात अाले.
याेगायाेगाने हे ठराव एकाच दिवशी चर्चेला येत असताना दाेघांचा संयुक्त प्रस्ताव म्हणून या विषयावर चर्चेला सामाेरे जाण्याचा सामंजस्यपणाही दाेन्ही बाजूंना दाखवता अाला नाही. विशेष म्हणजे राज्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या अशा मुद्द्यावर विधानसभेत चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री, विराेधी पक्षनेते व बहुतांश मंत्री, अामदारांची अासने मात्र रिकामीच हाेती.

भाजपचे अामदार अाशिष शेलार यांनी बुधवारी विधानसभेत सत्ताधारी पक्षाकडून मराठा अारक्षणाच्या विषयावर चर्चेचा प्रस्ताव ठेवला हाेता. मात्र, अध्यक्षांनी ताे स्वीकार करून वेळेअभावी दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी त्यावर चर्चा करण्याचे निर्देश दिले, तर दुसरीकडे गुरुवारी नियमानुसार विराेधी पक्षांच्या प्रस्तावासाठी वेळ अाधीच राखून ठेवण्यात अाली हाेती.
त्यांनीही मराठा- मुस्लिम व धनगर समाजाच्या अारक्षणाबाबत चर्चेचा प्रस्ताव दिला हाेता. दुपारपर्यंत लक्षवेधी, विधेयके संमत करण्याची प्रक्रिया पार पाडल्यानंतर दाेन्ही बाजूंनी अामचाच प्रस्ताव चर्चेला घ्या, अशी अाग्रही मागणी करण्यात अाली.
‘अाम्ही कालच प्रस्ताव मांडला हाेता, त्यावर अाताच चर्चा हाेणे गरजेचे अाहे,’ असे भाजप- शिवसेनेचे अामदार सांगत हाेते, तर ‘अाजचा वार विराेधकांचा हक्काचा अाहे,’ असा दावा विराेधकांकडून केला जात हाेता. दाेन्ही बाजूंचे सदस्य अध्यक्षांसमाेरील माेकळ्या जागेत येऊन जाेरजाेराने बाजू मांडत हाेते. त्यावर दाेन्ही बाजूंचे विषय एकच असल्यामुळे संयुक्त प्रस्ताव करून एकत्रित चर्चा करावी, अशी सूचना अध्यक्षांनी मांडली. मात्र, त्याला काेणीही तयार झाले नाही.
सत्ताधाऱ्यांचा प्रस्ताव केवळ मराठा अारक्षणावर अाहे तर अामचा मराठा- मुस्लिम- धनगर अारक्षणाचा असल्याचे पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्ट केले. अखेर मधला मार्ग म्हणून काही वेळ सत्ताधाऱ्यांची तर काही वेळ विराेधकांची चर्चा घेण्यात अाली. हा गाेंधळ सुरू असताना मराठा अारक्षण समितीचे अध्यक्ष, शिक्षणमंत्री विनाेद तावडे सभागृहात हाेते. मात्र, चर्चा सुरू हाेताच त्यांनीही सभागृहातून काढता पाय घेतला.
सत्ताधाऱ्यांच्या प्रस्तावावर शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या एकेका सदस्याने भाषण करून मराठा अारक्षणाची जाेरदार मागणी केली. मात्र, या सदस्यांची भाषणे सुरू असताना एखाद- दुसरा अपवाद वगळता मंत्र्यांची सर्व बाके मात्र रिकामीच हाेती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सत्ताधारी पक्षाचे बहुतांश ज्येष्ठ मंत्री गैरहजर हाेते. विराेधी बाकावरही फारशी गर्दी नव्हती. ज्येष्ठ नेत्यांपैकी केवळ पृथ्वीराज चव्हाण हजर हाेते.
मराठा अामदारांचीच दांडी
विधानसभेतील २८८ पैकी १४३ मराठा अामदार अाहेत. त्यापैकी अाजच्या चर्चेला दाेन्ही बाकावर ४० ते ४५ सदस्य उपस्थित हाेते. बहुतांश मराठा मंत्री व अामदारांनी या चर्चेकडे पाठ फिरवली. विराेधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, पतंगराव कदम या ज्येष्ठ मराठा नेत्यांचीही अनुपस्थिती हाेती.
धनगर अारक्षणाचा पाठपुरावा करणारे मंत्री महादेव जानकर व अादिवासींचे अारक्षण धनगरांना न देण्याची भूमिका ठामपणे मांडणारे अादिवासी विकास मंत्री विष्णू सवरा हे दाेन बिगर मराठा मंत्री मात्र बराच वेळ चर्चा एेकत बसून हाेते. विशेष म्हणजे बहुतांश मुस्लिम अामदार मात्र हजर हाेते, त्यांनी मुस्लिम अारक्षणाची बाजूही भक्कमपणे मांडली.
बातम्या आणखी आहेत...