आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री फडणवीसांची महाराष्ट्रातच आवश्यकता, वाड्यावरील गणेश स्थापनेनंतर गडकरींचे वक्तव्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात चांगले काम केले आहे. केंद्रातही चांगले काम करण्याची त्यांची क्षमता आहे. पण, राज्यातील अनेक आव्हाने समस्या बघता महाराष्ट्रात त्यांच्या नेतृत्वाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. अमेरिकेत असलेले नितीन गडकरी गुरुवार, २४ ला परत आले. शुक्रवार, २५ ला त्यांच्या महालातील निवासस्थानी गणेशाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी ते बोलत होते.

माझ्याकडे नवीन खात्याची जबाबदारी येणार असल्याचे मला माध्यमातून समजले. पण कुणाला कोणते खाते द्यायचे याचा अधिकार पंतप्रधानांना असतो. रस्ते परिवहन शिपिंग विभागाचेच एवढे काम आहे की, त्यामुळेच थकलो आहे. याच खात्यात खूप काही करायचे आहे. त्यामुळे पुन्हा नव्या खात्याचा भार पेलण्यास वेळ नसल्याचेही गडकरी म्हणाले. दरम्यान, अनेक देशात खास करून अमेरिकेत रस्ते वाहतूक, नागरी उड्डयन, शिपिंग रेल्वे अशी सर्व इन्फ्रास्ट्रक्चरची खाती एकाच इन्फ्रास्ट्रक्चर विभागाकडे असतात. पण, खाते कुणाला द्यायचे याचा निर्णय शेवटी पंतप्रधान घेत असतात, असे गडकरी म्हणाले.
 
गणेश ही िवद्येची देवता आहे. येणाऱ्या काळात ज्ञान, विज्ञान तंत्रज्ञानाचा उपयोग करून देशाने चौफेर विकास करावा, हीच गणेशाजवळ प्रार्थना आहे. भय, भूक भ्रष्टाचारमुक्त भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गणेशाने बळ द्यावे, एवढीच प्रार्थना आहे, असे गडकरी म्हणाले. 
बातम्या आणखी आहेत...