आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HBD CM : फडणवीस एकावेळी प्‍यायचे पाच ग्‍लास मिल्‍कशेक, बालपणीच्‍या फोटोसह वाचा बरचं काही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मामेभावांसोबत उजवीकडून मुख्‍यमंत्री. - Divya Marathi
मामेभावांसोबत उजवीकडून मुख्‍यमंत्री.
औरंगाबाद - राज्‍याचे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उत्‍कृष्‍ठ वक्‍ते, राजकारणी आणि वादविवादपटू तर आहेतच. पण ते तेवढेच भारी खवैय्येही आहेत. मुख्‍यमंत्र्यांचे अमरावतीचे मामेभाऊ राहूल कलोती यांनी त्‍यांच्‍या बालपणीच्‍या विविध आठवणी सांगितल्‍या. ते म्‍हणाले, "देवेंद्रजींना इडली, पोहे, जलेबी हे पदार्थआवडतात. ते अमरावतीला असत तेव्‍हा राजकमल चौकातील दुग्‍धपूर्णा कोल्‍ड्रिंस येथे एकावेळी पाच-पाच मिल्‍क शेकचे ग्‍लास पित असत.' कलोती यांनी divyamarathi.com ला मुख्‍यमंत्र्यांच्‍या शालेय, महाविद्यालयीन जिवनातील अशाही काही आठवणी सांगितल्‍या की, ज्‍या वाचून आश्‍चर्य वाटेल. या पॅकेजच्‍या माध्‍यमातून मुख्‍यमंत्र्यांचे विविध पैलू जाणून घ्‍या.

शेतकरी कुटूंबात २२ जुलै १९७० रोजी जन्‍मलेल्‍या देवेद्र फडणवीस यांना अभ्‍यासू वृत्‍ती, तल्‍लख बुद्धीमत्‍ता आणि जनसंपर्काच्‍या जोरावर आज महाराष्‍ट्राच्‍या मुख्‍यमंत्री पदापर्यंत पोहोचता आले. त्‍यांच्‍या प्रवासावरून त्‍यांचे राजकीय कौशल्‍य निश्‍चितच लक्षात येते. १९९९ ते २०१४ सालापर्यंत विधिमंडळात ते आमदार राहिले. भारतीय जनता पक्षात विविध जबाबदा-या त्‍यांनी सांभाळल्‍या आहेत.
उत्‍कृष्‍ठ क्रिकेटर
मॉडेलिंगचा शौक असणा-या फडणवीसांना नागपूर आणि अमरावतीने उत्‍कृष्‍ठ क्रिकेटपटू म्‍हणूनही जवळून पाहिले आहे. या शहरांमध्‍ये अनेक सामने त्‍यांनी गाजवले आहेत. अमरावतीच्‍या स्‍नेहवर्धक क्रीडामंडळाचे ते कर्णधार होते. आजही येथील जुने क्रिकेटर त्‍यांचे चांगले मित्र आहेत.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, मुख्‍यमंत्र्यांचे बालपणीचे फोटो व खास पैलू..