फडणवीस एकावेळी प्‍यायचे / फडणवीस एकावेळी प्‍यायचे 5 ग्‍लास मिल्‍कशेक, पाहिलेत का हे दुर्मिळ फोटो

डावीकडून मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस. डावीकडून मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस.
डावीकडून मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस. डावीकडून मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मामाच्‍या शेजारी डावीकडून मुख्‍यमंत्री. मामाच्‍या शेजारी डावीकडून मुख्‍यमंत्री.
वाजपेयी यांच्‍यासोबत देवेंद्र फडणवीस. वाजपेयी यांच्‍यासोबत देवेंद्र फडणवीस.
मुख्‍यमंत्री दुचाकीचे शौकीन आहेत. मुख्‍यमंत्री दुचाकीचे शौकीन आहेत.
कौटुंबिक कार्यक्रमात मुख्‍यमंत्री. कौटुंबिक कार्यक्रमात मुख्‍यमंत्री.
परिवारासोबत. परिवारासोबत.

दिव्‍य मराठी वेब टीम

Jul 21,2016 11:59:00 AM IST
नागपूर - राज्‍याचे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस आहे. ते उत्‍कृष्‍ठ वक्‍ते, राजकारणी आणि वादविवादपटू तर आहेतच. पण ते तेवढेच भारी खवैय्येही आहेत. मुख्‍यमंत्र्यांचे अमरावतीचे मामेभाऊ राहूल कलोती यांनी त्‍यांच्‍या बालपणीच्‍या विविध आठवणी सांगितल्‍या. या संग्रहात आम्‍ही आपल्‍याला काही खास बाबी सांगत आहोत.
कलोती यांनी सांगितले, "देवेंद्रजींना इडली, पोहे, जलेबी हे पदार्थ आवडतात. ते अमरावतीला असत तेव्‍हा राजकमल चौकातील दुग्‍धपूर्णा कोल्‍ड्रिंस येथे एकावेळी पाच-पाच मिल्‍क शेकचे ग्‍लास पित असत.' कलोती यांनी divyamarathi.com ला मुख्‍यमंत्र्यांच्‍या शालेय, महाविद्यालयीन जिवनातील अशाही काही आठवणी सांगितल्‍या की, ज्‍या वाचून आश्‍चर्य वाटेल. या पॅकेजच्‍या माध्‍यमातून मुख्‍यमंत्र्यांचे विविध पैलू जाणून घ्‍या.

शेतकरी कुटूंबात २२ जुलै १९७० रोजी जन्‍मलेल्‍या देवेद्र फडणवीस यांना अभ्‍यासू वृत्‍ती, तल्‍लख बुद्धीमत्‍ता आणि जनसंपर्काच्‍या जोरावर आज महाराष्‍ट्राच्‍या मुख्‍यमंत्री पदापर्यंत पोहोचता आले. त्‍यांच्‍या प्रवासावरून त्‍यांचे राजकीय कौशल्‍य निश्‍चितच लक्षात येते. १९९९ ते २०१४ सालापर्यंत विधिमंडळात ते आमदार राहिले. भारतीय जनता पक्षात विविध जबाबदा-या त्‍यांनी सांभाळल्‍या आहेत.
उत्‍कृष्‍ठ क्रिकेटर
मॉडेलिंगचा शौक असणा-या फडणवीसांना नागपूर आणि अमरावतीने उत्‍कृष्‍ठ क्रिकेटपटू म्‍हणूनही जवळून पाहिले आहे. या शहरांमध्‍ये अनेक सामने त्‍यांनी गाजवले आहेत. अमरावतीच्‍या स्‍नेहवर्धक क्रीडामंडळाचे ते कर्णधार होते. आजही येथील जुने क्रिकेटर त्‍यांचे चांगले मित्र आहेत.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, मुख्‍यमंत्र्यांचे बालपणीचे फोटो व खास पैलू..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
चिखलदरा आवडते ठिकाण देवेंद्रजी आणि आम्ही भरपावसात दुचाकीने चिखलदरा येथे जात होतो. ते त्यांचे आजोळ असल्याने पंधरा-पंधरा दिवस आम्ही तेथे राहत होतो. चिखलद-यातील अस्सल खव्याच्या ते प्रेमात पडले होते. अर्धाकिलो खव्यात पावकिलो साखर मिसळून ते खात असत. ही अनोखी आठवण त्यांचे मामेभाऊ कलोती सांगतात.फडणवीस टूव्हिलरचे शौकीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे टूव्हिलरचे भारी शौकीत आहेत. त्यांनी वीस वर्षांपूर्वी लॅम्ब्रेटा स्कूटर त्यानंतर बुलेट या गाड्या घेतल्या होत्या. आजही त्यांनी या आपल्या आवडत्या बाईक्स सांभाळून ठेवल्या अाहेत.नागपूर विद्यापीठातून एलएल.बी फडणवीस यांनी व्यवसाय व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी घेतली. जर्मनीतील संस्थेमध्ये डिप्लोमा इन मेथड्स ॲन्ड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट हा डिप्लोमा त्यांनी मिळवला. नागपूर विद्यापीठातून त्यांनी एल्एल.बी चे शिक्षण पूर्ण केले.मुख्यमंत्र्यांना वकील व्हायचे होते ‘इंदिरा गांधींनी बाबांना अटक केली म्हणून मी इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये शिकणार नाही. असे त्यांनी वयाच्या सहाव्या वर्षी आईला बजावले होते. शेवटी त्यांची शाळा बदलावी लागली. सुरूवातीला त्यांना शाळेची फार फिकीर नव्हती. दहावीपर्यंत ते हुशार विद्यार्थी कधीच नव्हते. ते सतरा वर्षाचे असताना त्यांचे वडिल गंगाधरपंत यांचे निधन झाले. देवेंद्रने बीएस्सी अॅग्रीकल्चर करून शेती करावी असे त्यांच्या आईला वाटत होते. पण आपण राजकारणात जाणार असे त्यांनी जाहीर केले. पुढे वकीलीचे शिक्षण त्यांनी गांभीर्याने घेतले. लॉमध्ये ते गोल्ड मेडलिस्ट आहेत. विजयाआत्या (मुख्यमंत्र्यांची आई) आणि आशीष (मुख्यमंत्र्यांचे मोठे बंधू) यांच्यामुळे आज देवेंद्रजी त्याच्या जागेवर उभा आहे. असेही कलाेती सांगतात.27 व्या वर्षी महापौर, 44 व्या वर्षी मुख्यमंत्री राजकारणात जायचे हा विचार पक्का असलेल्या फडणवीसांनी 22 व्या वर्षी नागपूर महापालिकेची निवडणूक जिंकली. ते नगरसेवक झाले. संघाचा पाठिंबा मिळवत वयाच्या 27 व्या वर्षी नागपूर महापालिकेचे महापौरपद त्यांना मिळवले. त्यांची अभ्यासू वृत्ती आणि वक्तृत्वाच्या जोरावर व्यासंगी लोकप्रतिनिधी म्हणून ओळख आहे. विधानसभेत सर्वाधिक प्रश्न विचारण्याचा विक्रम देवेंद्र फडणवीस व सुधीर मुनगंटीवार यांच्या नावावर आहे. 44 व्या वर्षी त्ाे मुख्यमंत्रीपदावर पोहोचले आहेत.
X
डावीकडून मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस.डावीकडून मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस.
डावीकडून मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस.डावीकडून मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मामाच्‍या शेजारी डावीकडून मुख्‍यमंत्री.मामाच्‍या शेजारी डावीकडून मुख्‍यमंत्री.
वाजपेयी यांच्‍यासोबत देवेंद्र फडणवीस.वाजपेयी यांच्‍यासोबत देवेंद्र फडणवीस.
मुख्‍यमंत्री दुचाकीचे शौकीन आहेत.मुख्‍यमंत्री दुचाकीचे शौकीन आहेत.
कौटुंबिक कार्यक्रमात मुख्‍यमंत्री.कौटुंबिक कार्यक्रमात मुख्‍यमंत्री.
परिवारासोबत.परिवारासोबत.