आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातपुड्याच्‍या कुशीत हिरवी शाल पांघरतो चिखलदरा, पाहा हे 20 PHOTO

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- सातपुडा पर्वतांच्या कुशीत वसलेल्या चिखलदरा हे विलोभनीय पर्यटनस्थळ देश-विदेशातील पर्यटकांचे पावसाळ्यात लक्ष वेधून घेते. वर्षभरही पर्यटक मोठ्या संख्‍येने येते येत असतात. सातपुडा पर्वतरांगेतील थंड हवेचे ठिकाण म्‍हणून प्रसिद्ध असलेले चिखलदरा नेहमीच आपल्‍या सौंदर्याने पर्यटकांना खुणावते. या संग्रहातील फोटोंमधून पाहूया चिखलदराचे सौंदर्य..
धुक्‍यात हरवतो रस्‍ता..
पावसाळ्यात दाट धुके आणि हिरवळीनं सजलेल्‍या पर्वतरांगा चिखलद-याच्‍या सौंदर्यात कमालीची भर घालतात. अवघा मेळघाटच पावसाळ्यात उठून दिसतो. येथील जंगल शुष्क पानझडीच्या प्रकारात मोडते. परिसरात नेहमीसाठी थंड आणि आरोग्‍यदायी हवामान असते. जैवविविधतेसाठी चिखलदरा पोषक आहे.
हे आहेत प्रेक्षणीय स्थळे....
चिखलदरा येथे 12 महत्‍त्‍वाची प्रेक्षणीय स्‍थळं आहेत. त्‍यामध्ये पंचबोल (इको पॉईंट), देवी पॉईंट, नर्सरी गार्डन, प्रॉस्पेट पॉईंट, बेलाव्हिस्टा पॉईंट, बेलेन्टाईन पॉईंट अशी स्‍थळ आहेत. धबधब्‍यासाठी प्रसिद्ध असलेला भीमकुंड, ‎मंकी पॉईंट, लॉग पॉईंट, लेन पॉईंट, वैराट पॉईंट व हरिकेन पॉईंट अशी स्‍थळंही आपल्‍याला आकर्षित करतील. येथील स्‍थळांची नावे ही ब्रिटिश अधिका-यांनी दिलेली आहेत.
कसे जावे
महामार्ग -
राष्‍ट्रीय महामार्ग क्र.6 वर अमरावती हे शहर आहे. तेथून चिखलदरा हे 94 किमी अंतरावर आहे. तेथून चिखलदरा येथे येण्यासाठी थेट एसटी सेवा आहे. रेल्वेने- मुंबई-हावडा या मुख्य रेल्वे मार्गावर बडनेरा रेल्वे स्टेशन आहे. तेथून अमरावतीसाठी एस.टी. किंवा खाजगी वाहन सहज उपलब्ध होते. अमरावतीहून चिखलदरा 94 किमी अंतरावर आहे. एसटी व खाजगी वाहन सहज मिळते.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा फोटो, आपणही पडाल या नंदनवनाच्‍या प्रेमात..
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...