आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याच्या टाक्यात पडून चिमुकल्याचा करुण अंत, इतवारा बाजार परिसरातील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- एका अडीच वर्षीय बालकाचा पाण्याच्या टाक्यात पडून दुर्देवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी (दि. ३) दुपारी दोन वाजताच्या सुमारास शहरातील इतवारा बाजार परिसरात घडली. फरहान अख्तर अब्दुल रहीम मन्सुरी (रा. इतवारा बाजार परिसर) असे मृतक बालकाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

फरहान अख्तर याच्या घराचे बांधकाम सुरू असल्यामुळे त्याचे कुटूंबीय याच परिसरात दुसरीकडे राहत आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारी वाजताच्या सुमारास फरहान खेळण्यासाठी घरातून बाहेर गेला. मात्र, बराच वेळानंतरही तो घरी परतला नाही, म्हणून त्याची आई शोधत बाहेर आली. त्यावेळी नवीन घराचे बांधकामाच्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या एका पाण्याच्या टाक्यात फरहान पडलेला दिसला. त्यावेळी त्याच्या आईने त्याला टाक्यातून काढून थेट इर्विन रुग्णालयात धाव घेतली. मात्र तपासणीअंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती कळताच परिसरात हळहळ व्यक्त होत होती. फरहानचे वडील अब्दुल रहीम मन्सुरी हे बीएसएनएलमध्ये टेलीफोन ऑपरेटर म्हणून कार्यरत आहे. फरहानला तीन भावंड असून, तो सर्वात लहान होता, अशी माहिती नागपुरी गेट पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अशोक मिश्रा यांनी दिली.

दरम्यान, सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्याने टाक्यांमध्ये पाण्याची साठवणूक केली जात असून, घरोघरी कुलरही सुरू आहेत. अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी पालकांनी आपल्या लहान मुलांकडे काळजीपूर्वक लक्ष पुरवणे गरजेचे आहे.
बातम्या आणखी आहेत...