आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती: अकरा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- वलगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावात राहणाऱ्या अकरा वर्षीय चिमुकलीच्या घरात प्रवेश करून तिला पाणी मागितले. शेजारी राहणाऱ्या या ४२ वर्षाच्या नराधमाने चिमुकलीला घरात एकटे गाठून तिचे हात बांधले, तसेच तोंडावर डोळ्यावर पट्टी बांधली. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. ही घटना १४ फेब्रुवारीला घडली असून या प्रकरणी शुक्रवारी (दि. १७) सायंकाळी वलगाव पोलिसांनी तक्रारीवरून नराधामाविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. 

हबीब शाह कादर शाह (४२) असे या नराधमाचे नाव आहे. हबीब शाह कादर शाह हा १४ फेब्रुवारीला या चिमुकलीच्या घरात गेला. त्याने पिण्यासाठी पाणी मागितले. त्यावेळी ही चिमुकली पाणी आणण्यासाठी गेली. त्याचवेळी या नराधमाने चिमुकलीला पकडून तीचे हातपाय बांधले तसेच तीच्या डोळ्यावर तोंडावर पट्टी बांधली. त्यानंतर याने चिमुकलीवर अत्याचार केला. तसेच झालेल्या प्रकाराबाबत वाच्यता केल्यास मारेल, अशी धमकी दिली. 

या प्रकाराने घाबरलेल्या चिमुकलीने दोन दिवस कोणालाही सांगितले नाही मात्र शनिवारी तीला वेदना झाल्यामुळे हा धक्कादायक प्रकार समोर आला. या घृणास्पद प्रकाराची तक्रार चिमुकलीच्या आईने शनिवारी सांयकाळी वलगाव पोलिसात केली. तक्रारीवरून पोलिसांनी नराधम हबीब शाह कादर शाह याच्याविरुध्द बलात्कार तसेच बाल लैंगीक अत्याचार कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...