आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिनाभरामध्ये धावणार शहर बस! करार संपल्यानंतरही धावताहेत जुन्याच बसेस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मनपाक्षेत्रात महिनाभरात शहर बस धावण्याचे संकेत प्राप्त झाले आहे. पूर्वीचा करार संपुष्टात अाल्यानंतर मनपा प्रशासनाने विपीन चव्हाण या नवीन कंत्राटदारासोबत फेब्रुवारी १६ रोजी करारनामा केला आहे. कंपनीसोबत बसेस बाबत कंत्राटदाराची सुरू असलेल्या चर्चेस यश येण्याची अपेक्षा प्रशासनास आहे.
मनपा क्षेत्रात दहा वर्षांपूर्वी शहर बस सेवा आरंभ केली. मनपातर्फे कंत्राट पद्धतीवर शहर बस सेवा नागरिकांना दिली जात आहे. मनपाच्या आमच्या परिवहनला दहा वर्षांचा कालावधी उलटल्याने अंबा माल प्रवासी वाहतूक संघाकडे याचा कंत्राट होता. अंबा माल प्रवासी वाहतूक संघाचा कंत्राट २४ फेब्रुवारी १६ रोजी संपुष्टात आला आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात नवीन कंत्राटदाराकडून शहर बस सेवा आरंभ होणे गरजेचे हाेते. मात्र जेएनयूआरएम अंतर्गत स्टार बसेस करीता अपेक्षित असलेले अनुदान मिळणार नसल्याचे काही महिन्यांपूर्वी स्पष्ट झाले. त्यामुळे मनपावर नवीन निविदा प्रक्रिया राबवण्याची वेळ आली. नव्याने राबवण्यात आलेल्या प्रक्रियेत विपीन चव्हाण या कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली. फेब्रुवारी १६ रोजी नवीन कंत्राटदारासोबत करारनामा देखील करण्यात आला, असे असताना अद्याप शहर बसेस शहरात पोहोचल्या नाही. त्यामुळे जुन्याच कंत्राटदारावर शहर बसची मदार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अमरावती महापालिकेसाठी टाटा कंपनीने निर्माण केलेल्या स्टार बसेस याव्यात म्हणून पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न करण्यात आले. महापालिकेचे होणारे नुकसान लक्षात घेता कंत्राटदाराने देखील स्टार बसेस घेण्यास सहमती दर्शवली. बसेसच्या भावाबाबत अद्याप एकमत होऊ शकले नाही. मात्र आगामी एक महिन्यात नवीन स्टार बसेस अमरावतीच्या सडकेवरुन धावेल, असा विश्वास महापालिका प्रशासनास आहे.