आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहरात ‘स्वच्छ भारत’ला सुरुंग,कचरा उचलण्याच्या निविदेला अल्प प्रतिसाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - देशात स्वच्छता सुआरोग्य नांदावे यासाठी केेंद्र शासन विविध योजना आणि उपक्रम राबवत आहे. परंतु, सद्या शहरातील विविध भागात कचऱ्याचे ढिग साचल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. परिणामी पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत मिशनला महापालिका प्रशासनाने शहरात सुरुंग लावल्याचे चित्र निर्माण झाले आहे. प्रशासनाने नियुक्त केलेल्या यंत्रणेकडून शहरातील कचरा वेळेवर उचलला जात नसल्यामुळे रोगराईला निमंत्रण मिळत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
शहरातून दररोज निघणाऱ्या लाखो टन कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी महापालिका प्रशासनाची स्वतंत्र यंत्रणा कार्य करते. कचऱ्यामुळे नागरी आरोग्याची समस्या निर्माण होऊ नये म्हणून कोट्यवधी रुपये महापालिका खर्च करते. मात्र शहरात जागोजागी साचून असलेल्या दुर्गंधीयुक्त ढिगांमुळे कोट्यवधी रुपये कचऱ्यात जात चित्र आहे. प्रशासनाकडून ठेवण्यात आलेल्या ४०४ कंटेनर तर २५० ओपन स्पॉटवर त्या परिसरातील कचरा आणून टाकल्या जातो. कंटेनर असल्यास त्यामध्ये कचरा टाकणे गरजेचे आहे. मात्र कंटेनरच्या आजूबाजूला कचरा आणून टाकल्या जातो. खाली टाकण्यात आलेला कचरा सतत सुरू असलेल्या पावसामुळे कुजून गेला आहे.

निविदेस मुदतवाढ : कचऱ्याची उचलण्यासाठी कंत्राटदाराच्या नियुक्तीसाठी महापालिका प्रशासनाने निविदा प्रक्रिया आरंभ केली आहे. २९ सप्टेंबरपर्यंत निविदा मागविण्यात आल्या होत्या. मात्र अल्प प्रतिसाद मिळाल्याने निविदा प्रक्रियेस ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

शाळेच्या प्रवेशद्वारात कचरा : शहरातील नामांकित होली क्राॅस शाळेच्या प्रवेशद्वाराला लागून असलेल्या गल्लीत मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. बस स्थानक परिसराकडे जाणाऱ्या मार्गाचा विद्यार्थी तसेच अनेक नागरिक वापर करतात. येथे असलेल्या कंटेनरच्या बराच दूर कचरा कुजल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.
बडनेरात दुर्गंधीने स्वागत : अमरावती कडून बडनेरात प्रवेश करतात उग्र दुर्गंधीने स्वागत होते. विश्वकर्मा वर्कशाॅप समोर मोठ्या प्रमाणात घनकचरा तसेच मांस रस्त्याच्या कडेला आणून टाकले जाते. त्यामुळे या परिसरातून नागरिकांना नाकाला रुमाल लावून जाण्याखेरीज अन्य पर्याय नाही. मांस टाकल्या जात असल्याने येथे सतत कुत्र्यांचा धोका देखील आहे.
बातम्या आणखी आहेत...