आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर ‘क्राईम ब्रँच’ प्रमुखपदी पोलिस निरीक्षक प्रमेष आत्राम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मागीलचार महीन्यांपासून अमरावती शहराच्या क्राईम ब्रँचला पेालिस निरीक्षक नव्हते. दरम्यान बहुप्रतिक्षेत असलेली या पदावरील ‘ऑर्डर’ पोलिस आयुक्त दत्तात्रय मंडलीक यांनी बुधवारी (दि. ४) काढली. क्राईम ब्रँचला पोलिस निरीक्षक प्रमेष आत्राम यांची बदली झाली. याचवेळी सात अधिकाऱ्यांची गुन्हे शाखेच्या पाच कर्मचाऱ्यांची सुध्दा बदली झाली आहे. 
 
पोलिस निरीक्षक प्रमेष आत्राम मागील काही दिवसांपासून राजापेठचे प्रभारी ठाणेदार होते. मात्र आज त्यांची बदली गुन्हे शाखेला झाली. याचवेळी राजापेठला ठाणेदार पोलिस निरीक्षक किशाेर सुर्यवंशी यांची बदली झाली तर पेालिस निरीक्षक शिषीर मानकर यांची सीएमसी सेलला बदली झाली आहे. याचवेळी सीसीटीएनएसला कार्यरत असलेले एपीआय अतुल वर यांची आर्थीक गुन्हे शाखेला तसेच सीएमसी सेलला कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक नितीन थोरात यांची गुन्हे शाखेला बदली झाली. एपीआय कविता पाटील यांची अर्ज शाखेला बदली झाली. तसेच गुन्हे शाखेला कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर नरवने यांची वलगाव, निलेश जुनघरे - बडनेरा, प्रणय वाघमारे - नांदगाव पेठ, विजय पेठे -भातकुली आणि अक्षय देशमुख - खोलापूरी गेटला बदली झाली आहे. गुन्हे शाखेत व्यापक फेरबदल होणार असल्याची चर्चा मागील अनेक दिवसांपासून पोलिस दलात सुरू होती. अखेर पोलिस आयुक्तांनी ते फेरबदल करून आज या चर्चेला पुर्णविराम दिला आहे. दरम्यान शहरात वाढलेले गुन्हे त्या तुलनेत उघड होण्याचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे ते गुन्हे उघड करून गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान पोलिस निरीक्षक आत्राम, नव्याने आलेले पीएसआय थोरात तसेच गुन्हे शाखेत कार्यरत असलेले इतर अधिकारी कर्मचाऱ्यांसमोर राहणार आहे.
बातम्या आणखी आहेत...