नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बुलेट प्रुफ गाडी सोमवारी दुपारी विमानतळाच्या परिसरात बंद पडली. त्यामुळे स्वत: फडणवीसांनी खाली उतरून गाडीला धक्का मारला. मात्र, गाडी सुरू झाली नसल्याने ते आमदार समीर मेघेच्या गाडीतून पुढे रवाना झाले.
नेमके काय झाले ?
> त्यांना विमानतळावर त्यांची शासकीय बुलेट प्रुफ गाडी अचानक बंद पडली.
> यावेळी गाडीत मुख्यमंत्री बसलेले होते.
> ताफ्यातील कर्मचारी गाडीला धक्का मारत होते. पण, गाडी सुरू होत नव्हती.
> त्यांची दमछाक पाहून स्वत: मुख्यमंत्री खाली उतरले आणि त्यांनी धक्का मारला.
सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
या प्रकारामुळे मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, त्यांची गाडी कशी बंद पडली, याची चौकशी तपास यंत्रणा करत आहे.