आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा अारक्षण, जानकरांच्या राजीनाम्यासाठी गदाराेळ, विधानसभेचे कामकाज तीन वेळा तहकूब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचा गुन्हा दाखल असलेले पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा, मराठा अारक्षणावर चर्चा करा व मलकापूर दंगलीतील गुन्हेगारांवर तातडीने कारवाई करा, या मागणीसाठी विराेधी पक्षाच्या अामदारांनी बुधवारी विधानसभेत सकाळपासूनच गदाराेळ केला. त्यामुळे दुपारी एक वाजेपर्यंत तीन वेळा कामकाज तहकूब करावे लागले. दीड वाजेनंतर मात्र कामकाज सुरळीत पार पडले.

मराठा अारक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी नागपूर विधानभवनावर राज्यस्तरीय माेर्चा अायाेजित करण्यात अाला हाेता. या पार्श्वभूमीवर विधानसभेतील सर्व कामकाज बाजूला ठेवून मराठा अारक्षणावर चर्चा घ्यावी, अशी मागणी विराेधी पक्षनेेते राधाकृष्ण िवखे पाटील यांनी केली. तसेच जानकर यांच्यावर कारवार्इ करावी, मलकापूर दंगलीस जबाबदार असणाऱ्यांवर कठाेर कारवार्इ करावी अादी मागण्याही विखे पाटील यांनी केल्या. मात्र, मराठा अारक्षण व जानकरांच्या विषयावर यापूर्वीच सभागृहात चर्चा झाली असल्याचे सांगून अध्यक्षांनी विराेधकांची मागणी फेटाळली व प्रश्नाेत्तराचा तास पुकारला. मात्र त्यामुळे संतप्त झालेल्या विराेधकांनी अध्यक्षांसमाेरील जागेत येऊन सरकारविराेधात जाेरदार घाेषणाबाजी सुरू केली. त्यामुळे अध्यक्षांना अनुक्रमे २० मिनिटे, २५ मिनिटे व ४० मिनिटांसाठी दुपारी दीड वाजेपर्यंत तीन वेळा कामकाज तहकूब करावे लागले. ‘सरकारने मराठा अारक्षणाबाबत ठाेस भूमिका स्पष्ट केली असती तर राज्यात लाखाेंच्या संख्येने माेर्चे निघालेच नसते. तसेच जानकरांसारख्या मंत्र्यांना मुख्यमंत्री पाठीशी घालत अाहेत. पदाचा दुरुपयाेग करणाऱ्या जानकरांचा राजीनामा घेतला पाहिजे,’ अशी भूमिका विखे पाटील, जयंत पाटील यांनी मांडली. लाखाेंच्या संख्येने निघत असलेल्या माेर्चाची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी, या विषयावर चर्चेसाठी विशेष अधिवेशन घ्यावे, अशी मागणी अामदार अब्दुल सत्तार यांनी केली. दरम्यान, मलकापूर दंगलीतील दाेषींवर कारवार्इ करण्याबाबत सरकारने तातडीने लक्ष घालावे, असे निर्देश अध्यक्षांनी दिले.
भगव्या फेट्यांएेवजी काळ्या फिती लावा : विखे
मराठा अारक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी सेना अामदार बुधवारी भगवे फेटे परिधान विधानसभेत अाले हाेते, तर काॅंग्रेसचे काही अामदारही भगव्या टाेप्या घालून अाले हाेते. मराठा अारक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात अाली. तर सत्तेत सहभागी असूनही जर मराठ्यांना अारक्षण देऊ शकत नसाल तर शिवसेना अामदारांनी भगवे फेटे घालण्याएेवजी काळ्या फिती लावाव्यात, असा सल्ला विखेंनी दिला. दरम्यान, दुपारी कामकाज तहकूब करण्यात अाल्यानंतर बहूतांश अामदार माेर्चात सहभागी हाेण्यासाठी गेले हाेते. दुपारी दीडनंतर सभागृहातील बरीच अासने रिकामीच हाेती.
पुढील स्लाइडवर वाचा... मुख्यमंत्री म्हणाले, जानकर सज्जन माणूस
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...