आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड; अर्थमंत्र्यांची आबाळ!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अमरावती जिल्ह्यातील पाच प्रचारसभांच्या नियोजनात हेलिकॉप्टर बंद पडल्याने बाधा आली. ऐनवेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार वापरत असलेले हेलिकॉप्टर पाठवल्याने अर्थमंत्र्यांना तीन प्रचारसभा चक्क मोबाइलवरच घ्याव्या लागल्या.

अमरावतीच्या बेलोरा विमानतळावर बुधवारी सकाळी साडेदहा वाजता कोल्हापूरहून विशेष विमानाने मुख्यमंत्र्यांचे आगमन झाले. पुढील प्रवास हेलिकॉप्टरने होता. नागपूरहून रेमंड कंपनीचे हेलिकॉप्टर यासाठी आले होते. मात्र हेलिकॉप्टरच्या लँडिंगदरम्यान एक इंजिन बिघडले आणि प्रचारसभांच्या नियोजनात बाधा आली. ऐनवेळी चंद्रपूरहून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारसभांकरिता मागवण्यात आलेले हेलिकॉप्टर अमरावतीला बोलावण्याचा निर्णय झाला आणि मुनगंटीवारांनी त्यांच्या पुसद व यवतमाळमधील पुढील प्रचारसभा मोबाइलवरून आटोपल्या.
बातम्या आणखी आहेत...