आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CM Devendra Fadnavis, Nitin Gadkari Present In RSS Parade

PHOTOS: देशात रामराज्य आणताना एकात्मता जपून शाश्वत विकास साधायला हवा -मोहन भागवत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- संपूर्ण मानवजातीचा विचार करण्याच्या मानसिकतेला आपल्याकडे धर्म म्हटले जाते. हिंदू धर्मात संयमाची शिकवण दिली आहे. शाश्वत विकास साधण्यासाठी एकात्मतेचा पाया रचत राजकीय-प्रशासकीय संतुलन राखावे लागेल तेव्हाच आपल्या देशात रामराज्य आणता येईल, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी विजयादशमी कार्यक्रमात स्वयंसेवकांना संबोधित करताना सांगितले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आज (गुरुवार) विजयादशमीचा कार्यक्रम नागपूर मुख्यालयी आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्त जोरदार तयारी करण्यात आली होती. भारतातील वेगवेगळ्या प्रांतातील स्वयंसेवक पथसंचलनासाठी नागपुरात दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वयंसेवकाच्या गणवेशात उपस्थित होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी विजयादशमीच्या कार्यक्रमाला संघाच्या गणवेशात उपस्थित राहण्याची ही पहिलाच वेळ आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेही प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते. त्यामुळे या कार्यक्रमाची संघाने जोरदार तयारी केली असल्याचे दिसून येत आहे.
कायमस्वरुपी विकासावर बोलताना मोहन भागवत म्हणाले, की आपल्याला संघटीत आणि समातायुक्त समाज निर्माण करावा लागेल. देशात सध्या विश्वासाचे, चैतन्याचे वातावरण आहे. विदेशात देशाची प्रतिमा उंचावत आहे. पश्चिमी देशांची भारताकडे बघण्याची दृष्टी बदलली आहे. भारताच्या योग्य नितींचा हा परिपाक आहे. नेपाळमध्ये भूकंप आल्यावर भारताने भरीव मदत केली. तेव्हा जगाने भारताचे कौतुक केले. यावेळी भारताचे नेतृत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले. जगाचे नेतृत्व करण्याचा प्रश्न येतो तेव्हा भारतीयाकडे आदराने बघितले जाते. पश्चिमेकडील देश सध्या प्रयोग-अनुभव-परिवर्तन यातून जात आहेत. आपल्याला याचे बाळकडू संस्कृतीतून मिळाले आहे. त्याची जपवणूक आपण करायला हवी. आपली मुल्ये अबाधित राखायला हवी. त्यातून सत्व राखले जाईल. शाश्वत विकासाची कल्पना साकारता येईल.
केंद्र आणि राज्य सरकारच्या कामांवर बोलताना भागवत म्हणाले, की निती आयोगाच्या माध्यमातून एकापेक्षा एक सरस योजना आणल्या जात आहेत. त्याचे जनमानसात कौतुक होत आहे. पण या योजना पूर्ण करण्यासाठी बराच कालावधी लागेल. तेवढा संयम जनतेला ठेवावा लागेल. पण याबाबत जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्याचे काम सरकारचे आहे. त्याशिवाय आखलेल्या योजनांचा ग्राऊंड लेव्हलवर काय फिडबॅक मिळतोय याचीही चाचपणी करावी लागेल. त्यातून विकासाचे मॉडेल यशस्वी होईल. विकास हा समन्वय आधारित हवा. त्यासाठी सर्वांसोबत चर्चा करण्याची आवश्यकता आहे.
बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करीत भागवत म्हणाले, की आयुष्याच्या सुरवातीलाच बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांच्या समस्या सोडविण्याचे मन बनविले होते. त्यासाठी ते प्रयत्नशील करीत होते. पण त्यांनी लगेच धर्म बदलला नाही. परिस्थितीचा अभ्यास करुन त्यावर विचार केला. त्यासाठी काही वर्षे जाऊ दिली. परिस्थिती बदलण्याची वाट बघितली. पण त्यात बदल होत नसल्याचे दिसून आल्यावर अखेर धर्मपरिवर्तन करण्याचा निर्णय घेतला.
जैन धर्मियांच्या संथारा प्रथेवर बोलाताना भागवत म्हणाले, की जैन धर्मात संथाराची जुनी परंपरा आहे. ती आजही कायम आहे. त्यात लगेच बदल करणे योग्य नाही. त्यासाठी त्या समाजातील आचार्यांशी संपर्क साधायला हवा. चर्चा घडवून आणायला हवी. त्यानंतर बदल घडवून आणायला हवा. बदलाची गरज नसेल तर ही परंपरा जशीच्या तशीच ठेवायला हवी.
दहशतवादावर बोलताना मोहन भागवत म्हणाले, की सध्या पाकिस्तान द्वेषाचे राजकारण करीत आहे. चीनचा साम्राज्यवाद दिसून येतोय. आखाती देशात इस्लामिक स्टेट सारख्या दहशतवादी संघटना कट्टरतेचे राजकारण करीत आहे. या संघटनांमुळे भारतासमोर संरक्षणाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. देशांतर्गत वातावरणही बिघडत आहे. तरुण वर्ग या संघटनाकडे आकर्षित होत आहे. यावर आपल्याला तोडगा काढावा लागेल.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, नागपुरच्या रेशिमबाग मैदानावर सुरु असलेला संघाचा दिमाखदार विजयादशमी सोहळा...