आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सारंगखेडा येथील चेतक महोत्‍सवाला मुख्‍यमंत्र्यांची भेट, अश्वसंग्रहालायच्या इमारतीचे केले भूमी पूजन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सारंगखेडा - नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथील एकमुखी दत्तप्रभूंच्या यात्रेचे प्रमुख अाकर्षण असलेल्या घोडे बाजाराला आज गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी भेट दिली. यावेळी त्‍यांनी  सारंगखेडा येथील अश्वसंग्रहालायच्या इमारतीचे भूमी पूजन केले. पर्यटन विभागाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे अश्व रुग्णालय व संग्रहालय येथे उभारण्यात येणार आहे.

 

अश्‍व संग्रहालय जागतिक आकर्षणाचे केंद्र बनेल- मुख्‍यमंत्री

यावेळी सभेला संबोधित करताना मुख्‍यमंत्री फडणवीस म्‍हणाले, नंदुरबार जिल्‍ह्यातील सारंगखेडा घोडा बाजार हा तब्‍बल 300 वर्षे जुना महोत्‍सव आहे. महाभारत कालखंडात सारंगखेडा बाजाराच्‍या खाणाखूणा आढळून येतात. सारंगखेड्याचे अश्व संग्रहालय
 देशातले सर्वात सुदंर आणि जागतिक आकर्षणाचे केंद्र बनेल. नंदुरबारमधील राज्यातील दुसरे थंड हवेचे ठिकाण असलेले तोरणमाळ विकसीत करण्याचा राज्‍य शासनाचा संकल्प आहे. आतापर्यंत ब्रॅन्‍डींग करु शकलो नाही पण आता या सर्कलचा विकास होणार आहे. आम्‍ही येथील

आदिवासी संकृती जगासमोर आणण्‍याचा प्रयत्‍न करणार आहोत.


जगात प्रसिद्ध आहे 'चेतक महोत्‍सव'
रविवार 3 डिसेंबरपासून या यात्रेला प्रारंभ झाला आहे. महिनाभर चालणा-या या यात्रेत अनेक लहानमोठे व्‍यावसायिक दाखल झाले आहेत. त्यात अश्व विक्रेत्यांसह बैल व शेतीपयाेगी अवजारे, संसारोपयोगी साहित्य, मसाले विक्रेत्यांचा समावेश आहे.
‘चेतक महोत्सव’ ही यात्रा जगाच्या नकाशावर गेली आहे. ही खान्‍देशातील सर्वात मोठी यात्रा आहे. राज्याच्या पर्यटन विभागाने यात्रेला यंदा नवा लूक दिला आहे. या महोत्सवात अश्वांच्या स्पर्धा होणार आहेत. विजेत्या अश्वमालकांचा बक्षिसे देऊन गौरव करण्यात येईल. ‘पुष्कर’ व ‘रण’ उत्सवाच्या धर्तीवर यात्रेत ‘चेतक महोत्सव’ यशस्वी करण्यासाठी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न होत आहेत. येथील घोडे बाजारात देशातील विविध राज्यातून अश्व विक्रेते दाखल झाले आहेत. महोत्‍सवामुळे खान्‍देशातील पर्यटनाला चालना मिळाली, असे चेतक महोत्सव समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांनी सांगितले आहे.

 

लेझर शो, हॉर्स रायडिंग
यात्रेसाठी पर्यटन विभागाने दिलेल्या निधीतून अश्व व अश्व मालकांसाठी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. तापी नदीवरील बॅरेजजवळ लेझर शो, बोटिंग, वॉटर स्पोर्टस, हॉर्स रायडिंग आदींचा आनंद पर्यटकांना नि:शुल्क लुटता येणार आहे.


अश्व छायाचित्रांचे प्रदर्शन
राजस्थान व कच्छच्या धर्तीवर अश्‍वांना राहण्यासाठी ७० तंबू उभारण्यात आले आहेत. अश्व स्पर्धांच्या ठिकाणी वातानुकूलित प्रेक्षक गॅलरी उभारण्यात अाली आहे. चेतक फेस्टिव्हलसाठी सारंगखेडा ग्रामपंचायतीला सुमारे ९० लाखांचा निधी देण्यात आला आहे. या निधीतून दत्त मंदिराचे सुशोभिकरण व भक्त निवास बांधण्याचे नियोजन आहे. रशियन छायाचित्रकार कात्या डूझ, भारतीय मनू शर्मा यांचे अश्व छायाचित्रांचे प्रदर्शन भरवले आहे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, महोत्‍सवाचे व्हिडिओ आणि फोटोज...

बातम्या आणखी आहेत...