आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CM Fadnavis And Gadkari In Discussed Expansion Of Cabinet

मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यात मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणि विधान परिषद निवडणुकीतील उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात शनिवारी मध्यरात्री गडकरी वाड्यावर बंदद्वार चर्चा झाली.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. विधान परिषदेच्या आठ जागांचा निवडणूक कार्यक्रमही जाहीर झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर या दोघांत चर्चा झाली. मुख्यमंत्री रात्री साडेदहाच्या सुमारास गडकरी वाड्यावर पोहोचले. दोघांमध्ये रात्री पावणेबारापर्यंत चर्चा झाली. संभाव्य मंत्री, उमेदवारांची नावेही निश्चित झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दाेन्ही नेत्यांनी चर्चेची मािहती देण्यास नकार दिला. या विस्तारात तसेच विधान परिषद निवडणुकीत गडकरी यांच्या समर्थकांना किती प्रतिनिधित्व मिळते याकडे राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे.

पुढील स्‍लाइडवर वाचा टेकडी गणेश संस्थानचा ५१ लाख दुष्काळनिधी