आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात नगर परिषदांमध्येच निवडणूक आचार संहिता लागू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्ह्यातज्या नऊ नगर परिषदांमध्ये निवडणूक होणार आहे तेथेच १७ आॅक्टोबरच्या रात्री १२ वाजतापासून आचार संहिता लागू झाली आहे. ही आचार संचिता अमरावती महापालिका , तिवसा, चिखलदरा, धारणी भातकुली नगर पंचायत क्षेत्रात लागू नसल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी बुधवारी आयोजित पत्रपरिषदेत दिली.
मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत बहुतेक मंत्र्यांनी ज्या जिल्ह्यांमध्ये चारपेक्षा जास्त नगर परिषद निवडणूका होत आहेत, त्या संपूर्ण जिल्ह्यात निवडणूक आयोगाद्वारे लागू करण्यात आलेल्या आचार संहितेचा विरोध केला होता. त्यानंतरच निवडणूक आयोगाने नवे आदेश जारी केले.

२७ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांमध्ये मतदान होणार आहे. या नऊ नगर परिषदांमध्ये जिल्ह्यातील अचलपूर, अंजनगांव सूर्जी, दर्यापूर, चांदूर बाजार, मोर्शी, वरूड, शेंदुरजना घाट, चांदूर रेल्वे धामणगांव रेल्वेचा समावेश आहे. केवळ या नगर परिषद क्षेत्रांमध्येच १७ आॅक्टोबर रोजी रात्री १२ पासून आचार संहिता लागू झाली आहे. अमरावती मनपा क्षेत्रात मात्र आचार संहिता लागू नाही. त्यामुळे येथील विकासकार्य, भूमिपूजन कार्यक्रम सुरू राहतील. यासोबतच जिल्ह्यातील तिवसा, चिखलदरा, धारणी, भातकुली, नांदगांव खंडेश्वर या नगर पंचायतींमध्ये मागच्याच वर्षी निवडणूक झाली आहे. त्यामुळे या क्षेत्रांमध्येही आचार संहिता लागू नसल्याचे पत्रपरिषदेत जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. नऊ नगरपरिषदांमध्ये निवडणूक कार्यक्रम घाेषित होण्याआधी अर्थात १७ आॅक्टोबरपूर्वी ज्या विकास कामांना मंजुरी देऊन त्यांच्या कामाचे आदेश देण्यात आले आहेत. ती कामे आचार संहितेतही पूर्ण केली जातील.
अमरावती मनपा क्षेत्रात सुमारे २०० कोटी रु. ची विकास कामे पूर्ण केली जाणार आहेत. मनपा क्षेत्रात जोवर निवडणुकीच्या तारखेची घोषणा होत नाही, तोवर आचार संहिता येथे लागू होणार नाही, अशी माहिती पत्रपरिषदेत मनपा आयुक्त हेमंतकुमार पवार यांनी दिली. पत्रपरिषदेला जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, जिल्हा परिषदेची मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुळकर्णी उपस्थित होते.

पदवीधरमतदार नोंदणी नोव्हेंबरपर्यंत
आगामी पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषगाने नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी सुरू राहील, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रपरिषदेत दिली. आतापर्यंत हजार ५३० मतदारांची नोंदणी झाली आहे. मागच्या वर्षी ७४ हजार पदवीधर मतदारांनी नाेंदणी केली होती. अमरावती पदवीधर मतदारसंघात एकूण लक्ष ४० हजार पदवीधर मतदार आहेत. एक विभागीय अधिकारी पाच झोनल अधिकारी मतदार नोंदणी मोहिमेसाठी कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...