आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक कार्यक्रम घोषित झाला तर मनपा-जिल्हा परिषद निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्याची प्रतिक्षा आहे. या निवडणूका लक्षात घेता मनपा शाळांमध्ये आदर्श आचारसंहिता भंग होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी ई. झेड. खान यांनी शिक्षकांना दिले. 
 
मनपा निवडणुकीकरिता मतदान केंद्र म्हणून शाळांमधील वर्ग खोल्यांचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे मनपा शाळांमधील वर्ग खोल्यांमध्ये फर्निचर, विद्युत पुरवठा अद्यावत करणे. इमारत देखभाल दुरुस्ती अनुदानातून करणे. याकरता अनुदान शाळांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. पाण्याची व्यवस्था, स्वच्छता गृहांची आवश्यक किरकोळ दुरुस्ती करीत अद्यावत करणे. शाळांमध्ये स्नेहसंमेलन, आनंद मेळावा, क्रीडा समारोह कार्यक्रमांत मतदान जागृतीबाबत मार्गदर्शन करण्याकरता मनपा जनसंपर्क अधिकाऱ्यांना बोलवणे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत बजेट तयार करण्याचे काम सुरु असून कालमर्यादेत असल्याने करणे गरजेचे आहे. त्यामुळे शाळांकडून मागितलेली माहिती अचूक आपल्या केंद्र समन्वयकांकडे देण्याचे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांनी केले. विशेषतः अतिरिक्त वर्ग खोली बांधकाम प्रस्तावित करताना शाळेच्या पटसंख्येनुसार निकषानुसार आवश्यकता सर्वात महत्वाचे म्हणजे जागेची त्याच्या कागदपत्रांची उपलब्धता पूर्तता असणे आवश्यक आहे. केंद्र समन्वयकांनी सदर सर्व माहिती गोळा करुन मनपा शिक्षण विभागाकडे सादर करणे गरजेचे आहे. वर्गा-वर्गात अप्रगत विद्यार्थी दिसून येत आहेत, त्यांच्या करीता शिक्षक मुख्याध्यापकांनी विशेष नियोजन प्रयत्न करावे. अध्यापनाच्या जुन्या पद्धतींना चिकटून राहता ज्ञान रचनावाद, ई-लर्निंग, डिजीटल क्लास रूम या आधुनिक पद्धतींचा नियोजन पूर्ण वापर करावा. विद्यार्थी शाळा प्रगत करण्याचे आवाहन त्यांनी केले. लोकसहभाग, शाळा व्यवस्थापन समिती यांचे याकरता सहकार्य घ्यावे. प्रत्येक शाळेत शालेय वाहतूक परिवहन समिती स्थापन झालेली, कार्यरत असावी. दर तीन महिन्यांनी त्याची सभा घेवून इतिवृत्त ठेवावेत. शालेय पोषण आहार योजनेची माहिती दररोज नियमित करीत मासिक अहवाल महिन्याच्या तारखेला देण्याबाबत दक्षता घ्यावी. पुढच्या सहा महिन्यात सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांनी त्यांनी एक सूचना म्हणून शिक्षण विभागाला तसे पत्र अवश्य देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहे. 

वारंवार शाळेबाहेर जाणे आहे अयोग्य 
अनेक शिक्षक वारंवार शाळा सोडून बाहेर जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता बाहेर जाताना हलचल बुकात नोंद करणे गरजेचे आहे.