आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विदर्भात हुडहुडी: नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात थंडीचा कडाका वाढला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात थंडी जाणवायला लागली आणि नोव्हेंबर संपताना थंडी हुडहुडी भरवायला लागली. डिसेंबर कापरं भरवणारा राहिल, याची ही चाहुल आहे. थंडी वाढल्याने ऊनी कपड्यांचा बाजार तेजीत आहे. डांबराच्या गोळ्या टाकून कपाटात ठेवलेले स्वेटर, मफलर, कानटोप्या, हातमोजे बाहेर निघाले आहे. सायंकाळी नंतर अंधारायला होते आणि थंडी हातपाय पसरायला लागते. भुशाच्या तसेच कोळशाच्या शेगड्याही विक्रीला आल्या आहे. 


बुधवारी थंडीचा कडाका कायम होता. विदर्भात गोंदिया येथे किमान ११ अंश सेल्सिअस इतके कमी तापमान नोंदवण्यात आले. त्या नंतर नागपूर ११.६, यवतमाळ १२.४, वर्धा १२.५, वाशिम १३.२, ब्रम्हपुरी १२.३ इतके तापमान नोंदवण्यात आले. तर अकोला १५, अमरावती १४.८, बुलढाणा १५.२ अंश सेल्सिअस इतके तापमान होते. तुलनेने चंद्रपूर येथे किमान १५.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. विदर्भात २६ नोव्हेंबरला नागपूर येथे किमान १०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. 

बातम्या आणखी आहेत...