आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकारी गित्तेंचा मुंबईत गौरव,स्वच्छता अभियानात उत्कृष्ट कामगिरीबद्दल बीग बीच्या हस्ते सन्मानित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती-मुंबई - स्वच्छता अभियानात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अमरावतीचे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांचा अमिताभ बच्चन यांच्या हस्ते
शनिवारी मुंबईत गौरव करण्यात आला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्य शासनाचा नगरविकास विभाग आणि एनडीटिव्ही यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महा क्लिनेथॉन’ या स्वच्छता मोहिमेतंर्गत राज्यात सर्वोत्कृष्ठ काम करणाऱ्या तीन जिल्ह्ाधिकाऱ्यांना गौरविण्यात आले. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमितकुमार सैनी, नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कर्वे, औरंगाबादच्या जिल्हाधिकारी निधी पाण्डेय, अमरावतीचे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्यासह कागल, वेंगुर्ला, पाचगणी, सातारा, मुरगुड या नगरपालिकांचे मुख्याधिकारी नगराध्यक्ष आणि पुणे लोअर परेळ येथील संपूर्ण स्वच्छ झालेल्या सोसायटींच्या अध्यक्षांचा सत्कार बच्चन यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाला नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर, एनडीटीव्ही चे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम चंद्रा, नितीश कपूर आदी उपस्थित होते.

स्वच्छ महाराष्ट्र अभियानात यावर्षी स्वयंसेवकांसाठी ५० लाख तास श्रमदानाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता कार्यक्रमात स्वयंसेवकांनी आतापर्यंत ३३ लाख तास श्रमदान केले आहे.
जिल्हाधिकारी गित्ते यांचा गौरव करताना अमिताभ बच्चन.
बातम्या आणखी आहेत...