आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलेक्टरांनी जाणून घेतल्या तूर उत्पादकांच्या समस्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - दरवर्षीपेक्षा यावर्षी तुरीचे उत्पन्न जास्त प्रमाणात झाले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पन्न झालेल्या तुरीची खरेदी कालपासून बारदान्याअभावी थांबली. शेतकऱ्यांची बारदान्याची समस्या सोडविण्याकरिता जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला आज सकाळी भेट दिली तात्काळ २० हजार बारदाना खरेदी करण्याबाबतचे निर्देश त्यांनी एफसीआयला दिले. या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनिल वऱ्हाडे, अमरावतीचे तहसिलदार सुरेश बगळे, तलाठी पाटेकर, एफसीआयचे खरेदी अधिकारी वैभव मुंदरे उपस्थित होते. 
 
बारदान्याच्या कमतरतेमुळे तुरीच्या खरेदीची प्रक्रीया थांबता कामा नये. यासाठी एफसीआय ने कृषी उत्पन्न बाजार समितीकडून तात्काळ २० हजार बारदाना कर्ज तत्वावर घ्यावा तुरीची खरेदी सुरू करावी. धान्य साठवणीच्या समस्येवर त्यांनी सीडब्यूसीचे गोदाम तात्काळ उपलब्ध करून तेथे वीजपूरवठा करावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. 
 
एफसीआयने तीन दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खरेदी केलेल्या मालाची किंमत द्यावी. तुर खरेदीच्या वेळी व्यावहारीक पद्धतीने तुरीची श्रेणी, वजन माप ठरविण्यात यावे, कृषी उत्पन्न बाजार समितीने व्यापाऱ्यांना कमी किमतीमध्ये तुर खरेदी करण्याची परवानगी देवू नये, कोणीही असे करतांना आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे सांगीतले. यावेळी नाफेडच्या वतीने बडनेरा धारणी येथे नविन तुर खरेदी केंद्र सुरु करण्याबाबत प्रस्ताव सादर करावा असे निर्देश संबंधितांना दिले. 
बातम्या आणखी आहेत...