आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाविद्यालयात घडते विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व प्राचार्य डॉ. संयोगिता देशमुख यांचे प्रतिपादन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती :विद्यार्थीहा महाविद्यालयीन शिक्षणाचा आधार असून विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांचा विकास व्हावा म्हणून स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येत असते. जेव्हा विद्यार्थी महाविद्यालयाच्या बाहेर पडतात, तेव्हा त्यांच्या अंगी असणाऱ्या गुणांची समाजाला ओळख होऊ लागते, परंतु खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचे व्यक्तीमत्व घडवण्याचे काम महाविद्यालयातच होत असते, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. संयोगिता देेशमुख यांनी केले. अस्मिता शिक्षण मंडळद्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात नुकतेच वार्षिक स्नेहसंमेलन युवारंग- २०१७ चे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. 
 
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अस्मिता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मुरलीधर भोंडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण रंजन मंडळाचे संचालक डॉ. अविनाश असनारे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मिनल ठाकरे उपस्थित होत्या. स्नेहसंमेलनाची सुरुवात महात्मा फुले यांचे प्रतिमा पूजन दीप प्रज्वलनाने करण्यात आली.
 
प्राचार्य भांडे यांनी अध्यक्षीय भाषणातून स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण टप्पा असून तो त्यांच्या अंगभूत गुणांना वाव मिळवून देणारा सशक्त असा मंच आहे, असे मत व्यक्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसह कलात्मक गुणवत्तेलाही अधिक महत्त्व असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
 
डॉ. असनारे यांनी तरुणाईपुढे असलेल्या वाढत्या आव्हांनाबाबत चर्चा करून महाविद्यालयात प्रवेश घेतानाच विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करावे ते पूर्ण करण्याच प्रयत्न करावे, असे आवाहन केले. प्रास्ताविक प्रा. सोनाली आसरकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. स्वाती गिरासे यांनी केले, तर ऋणनिर्देश प्रा. गजानन रत्नपारखी यांनी केले. कार्यक्रमासाठी स्नेसंमेलन प्रभारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. 

विविध कलांचे सादरीकरण 
स्नेहसंमेलनाअंतर्गत माजी विद्यार्थी मेळावा, गीत गायन स्पर्धा, कवी संमेलन, रांगोळी, हस्तकला, प्रश्न मंजूषा, ट्रॅडिशनल शो, डीश डेकोरेशन, विविध क्रीडा स्पर्धा तसेच मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमाचे विद्यार्थ्यांद्वारे सादरीकरण करण्यात आले. 

गुणवंत विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव 
या वेळी विद्यापीठाच्या विविध परीक्षांमध्ये गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. स्नहेसंमेलनादरम्रूान आंतर महाविद्यालयीन गीत गायन स्पर्धेमध्ये प्रथम तीन क्रमांक पटकावलेल्या, तसेच महाविद्यालयातील विविध विभागांद्वारे त्या त्या विषयांमध्ये महाविद्यालयातून सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील या वेळी गौरव करण्यात आला.