आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेरंग आयुष्यात विविध रंगांसह पसरवला पुरणपोळीचा गोडवा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - सर्वांच्याच जीवनात होळीचे विशेष महत्त्व आहे. हा आनंद, उल्हासाचा सण! परंतु, ज्यांच्या आयुष्यातील रंग परिस्थिती, नियतीमुळे उडाले आहेत, अशांच्या आयुष्यात रंग भरण्यासाठी तसेच त्यांना काही क्षण का होईना आनंद देण्यासाठी संपूर्ण अमरावतीकरांच्या मदतीने भाजप सांस्कृतिक आघाडीने (ग्रामीण) होळीनिमित्त (१२ मार्च) पुरणपोळीचे वाटप करून वृद्ध, अपंग, अनाथांचे तोंड गोड केले. 
 
घरच्यांनी अव्हेरलेल्या ज्येष्ठांच्या मधुबन, मातोश्री, सुखशांती, गाडगेबाबा, वलगाव येथील वृद्धाश्रमांसोबतच अपंग विद्यालय कोंडेश्वर, सदाशांती अनाथालय, कॅम्प येथे भाजप सांस्कृतिक आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भेट देऊन सर्वांना पुरणपोळीचा घास भरवला. सोबतच मसालेभात, शिरा-पुरीचे जेवणही दिले. सर्वांच्या गळ्यात गाठ्यांचा हार घालून त्यांच्यासोबत रंगोत्सव साजरा केला. यासाठी शहरातील नागरिकांनीही यांगदान दिले.
 
सुमारे २२५ जणांसाठी ८५० पुरणपोळ्या स्वेच्छेने भाजप सांस्कृतिक आघाडीकडे आणून दिल्या.याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अतुल बनसोड, सरचिटणीस प्रा. नीलेश तारे , सचिव अमित सोनारकर, आकाश गिरमकर आदी उपस्थित होते.
 
या उपक्रमासाठी उत्स्फूर्त योगदान लाभल्याने होळीच्या सणाला अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद खुलले. यामुळे वृद्ध, अपंग, अनाथांमध्ये आपण एकटे नाही तर संपूर्ण समाज आपल्यासोबत आहे, अशी भावना बळावली. त्यांनाही होळीचा रंग नव्याने अनुभवता आल्याची माहिती भाजप सांस्कृतिक आघाडीने दिली आहे. 
 
साईबाबा विद्यालयात निसर्ग रक्षणाचा संदेश 
श्री साईबाबा विद्यालय, साईनगर राष्ट्रीय हरित सेनेच्या संयुक्त विद्यमाने परिसरात वृक्षवाचवण्यासोबतच पाणी वाचवण्याचा संदेश देण्यासाठी फेरी काढण्यात आली. सोबतच वृक्षाचे पूजन करून होळीत लाकडाचा गैरवापर टाळण्याचाही संदेश देण्यात आला.
 
एक वृक्ष हा लाखांचा पोशिंदा असतो त्यामुळे त्याची कत्तल करता त्याची पूजन करण्यात आले. वृक्षाच्या कुडीभोवती सुबक रांगोळी तसेच वृक्षाला गाठी फुलांची माळ घाण्यात आली. या उपक्रमाच्या माध्यमातून बालमनावर पर्यावरण रक्षणाचे संस्कार करण्यात आले. 
बातम्या आणखी आहेत...